OMG!! फॉरेन मीडियाने दीपिका पादुकोणला समजले प्रियांका चोप्रा!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2017 11:01 AM2017-03-07T11:01:13+5:302017-03-07T16:31:25+5:30
ट्रॅक सूट आणि चेह-यावर काळा गॉगल अशा थाटात दीपिका पादुकोण विमानतळावर उतरली. पण हे काय, फॉरेन मीडिया तिला प्रियांका चोप्रा समजून बसला. मग काय, दीपिकाला प्रियांका...प्रियांका...म्हणत फॉरेन मीडिया तिच्यामागे धावत सुटला.
द पिका पादुकोण आणि प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूडमध्ये बिझी आहे. हॉलिवूडमध्ये प्रियांकाने ब-यापैकी ओळख मिळवलीय. पण कदाचित दीपिका याबाबतीत बरीच मागे आहे. आमची बातमी वाचल्यानंतर कदाचित तुम्हालाही हे पटेल. होय, अलीकडे दीपिकासोबतचा घडलेला किस्सा यासाठी तुम्हाला ऐकावा लागेल.
हा किस्सा आहे, लॉस एंजिल्समधला. दीपिका पादुकोण लॉस एंजिल्सच्या विमानतळावर उतरली. आता विमानतळावर सेलिब्रिटींना टीपणारा मीडिया असणारच. भारताप्रमाणेच फॉरेन मीडियाही याबाबतीत कुठेही कमी नाही. विमानतळावर फॉरेन मीडिया हातात कॅमेरे घेऊन उभा होता. ट्रॅक सूट आणि चेहºयावर काळा गॉगल अशा थाटात दीपिका विमानतळावर उतरली. पण हे काय, फॉरेन मीडिया तिला प्रियांका चोप्रा समजून बसला. मग काय, दीपिकाला प्रियांका...प्रियांका...म्हणत फॉरेन मीडिया तिच्यामागे धावत सुटला.
आता यावर दीपिका काय करणार. बिचारीने याकडे दुर्लक्ष केले. दुर्लक्ष करत ती आपल्या गाडीकडे निघाली. पण एका पत्रकाराने आणखीच हाईट केली. त्याने थेट दीपिकाला प्रियांका समजून प्रश्नच विचारून टाकला. आॅस्कर सोहळा कसा राहिला? असे या पत्रकाराने विचारले. स्मार्ट दीपिकाने तरीही संयम ठेवला आणि हलकेसे स्मितहास्य करत, याकडे दुर्लक्ष करणेच योग्य समजले. केवळ आत्ताच नाही तर याआधी सुद्धा फॉरेन मीडिया दीपिका आणि प्रियांका या दोघींमध्ये गोंधळलेला दिसला होता. पण यावरून एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली, ती म्हणजे, हॉलिवूडच्या शर्यतील प्रियांका किती तरी पुढे निघून गेली आहे. तिला गाठायचे असेल तर दीपिकाला स्वत:चा वेग वाढवावा लागेल. निश्चितपणे दीपिकाच्या हातात अजूनही वेळ आहे. कारण प्रियांका केवळ नावाने लोकप्रीय आहे. कारण प्रियांकाचा चेहरा लोकप्रीय असता तर फॉरेन मीडिया गोंधळला नसताच.