बापरे..! इरफान खानने 'त्या' भयानक अनुभवानंतर टेलिव्हिजन इंडस्ट्रीला केला रामराम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 10:50 AM2021-06-09T10:50:50+5:302021-06-09T10:51:24+5:30

नव्वदच्या दशकात इरफान खान छोट्या पडद्यावर कार्यरत होता.

OMG ..! Irrfan Khan did well in the television industry after that horrible experience | बापरे..! इरफान खानने 'त्या' भयानक अनुभवानंतर टेलिव्हिजन इंडस्ट्रीला केला रामराम

बापरे..! इरफान खानने 'त्या' भयानक अनुभवानंतर टेलिव्हिजन इंडस्ट्रीला केला रामराम

googlenewsNext

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता इरफान खानने मागील वर्षी जगाचा निरोप घेतला होता. मात्र आजही त्याच्या चाहत्यांना त्याची कमतरता भासते. त्याच्या निधनानंतर माहित नसलेल्या बऱ्याच गोष्टी समोर होत्या. त्यातील एक किस्सा छोट्या पडद्यावरील आहे. एका भयानक अनुभवानंतर त्याने टेलिव्हिजन इंडस्ट्रीचा निरोप घेतला. 

प्रसिद्ध सिने पत्रकार भावना सोमया यांनी इरफानची ही आठवण शेयर केली आहे. नव्वदच्या दशकात इरफान खान छोट्या पडद्यावर कार्यरत होता. त्यावेळी तो एका क्राईम सीरिजमध्ये काम करत होता. छोट्या पडद्यावरील चित्रीकरण इतके जास्त असायचे की त्यासाठी रात्रंदिवस शूट करावे लागायचे. असेच एकदा इरफान आपले शूट पूर्ण करून घरी परतत होता. तो त्या दिवशी शूटिंगमुळे खूप थकला होता. त्याला कार चालवताना झोप येत होती. तेव्हा एक क्षण असा आला की इरफानला झोप कंट्रोल करणे अशक्य झाले आणि कार चालवता चालवता त्याला कारच्या स्टेअरिंगवरच झोप लागली.


ज्यावेळी त्याने डोळे उघडले तेव्हा त्याला काही समजत नव्हते मात्र सूर्याची किरणे त्याच्या चेहऱ्यावर पडत होती. अशाच अवस्थेत तो घरी पोहचला. आपल्या खोलीत जाऊन झोपला. या प्रकाराने इरफान खूपच अस्वस्थ झाला होता. घाबरला होता आणि त्याला काय करावे हे सूचत नव्हते. मग त्याच्या पत्नीने त्याला सांगितले की या प्रकारामुळे तो कित्येक दिवस त्याच्या खोलीतून बाहेर निघत नव्हता.

त्यावेळी इरफानने मनाशी पक्के केले की काम नसेल तरी चालेल. मात्र टेलिव्हिजन इंडस्ट्रीत परत काम करायचे नाही. त्यानंतर कधीच इरफानने टेलिव्हिजन इंडस्ट्रीकडे वळून पाहिले नाही. 

Web Title: OMG ..! Irrfan Khan did well in the television industry after that horrible experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.