OMG...! जान्हवीची तारेवरची कसरत...कधी वाढवतेय वजन तर कधी घटवतेय वजन, हा आहे तिचा फिटनेस फंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 08:31 PM2019-07-30T20:31:21+5:302019-07-30T20:32:12+5:30

धडक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या बॅक टू बॅक सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.

OMG ...! Janhvi's workout on the stars ... sometimes increasing weight or decreasing weight, is her fitness fundJanhvi Kapoor gained 6kg and lost 10 kg for upcoming movie | OMG...! जान्हवीची तारेवरची कसरत...कधी वाढवतेय वजन तर कधी घटवतेय वजन, हा आहे तिचा फिटनेस फंडा

OMG...! जान्हवीची तारेवरची कसरत...कधी वाढवतेय वजन तर कधी घटवतेय वजन, हा आहे तिचा फिटनेस फंडा

googlenewsNext

 

धडक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या बॅक टू बॅक सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. जान्हवी सध्या एक नाही तर दोन दोन चित्रपटाचं शूटिंग करते आहे. सध्या ती कारगिल गर्ल व रुहीअफ्जा या दोन चित्रपटांचं शूटिंग करत आहे. ती पहिल्यांदाच हॉरर कॉमेडी चित्रपटात काम करत असून दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. 
 
जान्हवीला या चित्रपटांसाठी तिचं वजन वाढवावं लागलं तर कधी घटवावं लागलं. सारखं सारखं वजनात बदल करण्यासाठी तिला खूप मेहनत घ्यावी लागत आहे.

तिला कारगिल गर्ल चित्रपटात हेल्दी दिसायचं आहे. त्यासाठी या चित्रपटाच्या पहिल्या शेड्युलसाठी सहा किलो वजन वाढवावं लागलं तर दुसऱ्या प्रोजेेक्टसाठी दहा किलो वजन घटवावं लागलं.


जान्हवीला सारखं सारखं वजन घटवावं व वाढवावं लागतं आहे. जान्हवी कारगिल गर्ल चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी तिच्या ट्रेनरकडून नवीन डाएट प्लान घेतला होता.

एका वेबसाईटला ट्रेनर नम्रताने सांगितलं की, जान्हवी सहा दिवस काम करते आहे. ज्यात दोन ते तीन तास वर्कआऊट करते आहे. सुरूवातीचे दोन दिवस स्पेशल एक्सरसाईज करते. त्यानंतर तिचं वर्कआऊटमध्ये बदल केला जातो. सातत्याने वर्कआऊट केल्यामुळे तिच्या पाठीला दुखापतही झाली होती.

जान्हवीच्या डाएटमध्ये स्वीट्सचाही समावेश असल्याचं ट्रेनर सांगितलं व पुढे म्हणाली की, जान्हवीला गोड खायला आवडतं. माझ्या आईनं बनवलेले हेल्दी लाडू आणि गुळ बनवले आहे. जे ते दिवसातून एक खाते. जेणेकरून ती हेल्दी दिसेल. हेच नाही तर त्यासाठी ती वर्कआऊटही करते.


जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती कारगिल गर्ल व रुहीअफ्जा व्यतिरिक्त दोस्ताना २ व तख्तमध्येही दिसणार आहे.

Web Title: OMG ...! Janhvi's workout on the stars ... sometimes increasing weight or decreasing weight, is her fitness fundJanhvi Kapoor gained 6kg and lost 10 kg for upcoming movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.