​OMG! काजोल तिच्या मुलांकडून करून घेते ही घरची कामं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2018 10:50 AM2018-01-13T10:50:47+5:302018-01-13T16:20:47+5:30

काजोलने बाजीगर, कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, दुश्मन यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकापेक्षा एक चांगल्या भूमिका साकारल्या ...

OMG! Kajol can be done by her children after the house chores | ​OMG! काजोल तिच्या मुलांकडून करून घेते ही घरची कामं

​OMG! काजोल तिच्या मुलांकडून करून घेते ही घरची कामं

googlenewsNext
जोलने बाजीगर, कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, दुश्मन यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकापेक्षा एक चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना केली जाते. काजोलच्या अभिनयामुळे प्रेक्षकांनी अक्षरशः तिला डोक्यावर घेतले आहे. काजोलने अभिनेता अजय देवगण सोबत लग्न केल्यानंतर चित्रपटांमध्ये काम करण्याचे प्रमाण खूपच कमी केले. ती दोन वर्षांतून एखादा चित्रपट करते. त्यामुळे काजोलचा आगामी चित्रपट कोणता असणार याची उत्सुकता तिच्या फॅन्सना लागलेली असते.
काजोल आणि अभिनेता अजय देवगण यांना निसा आणि युग अशी दोन मुले आहेत. आपल्या मुलांना स्वावलंबनाचे धडे देण्याचा ती नेहमीच प्रयत्न करते. काजोल ही प्रसिद्ध अभिनेत्री तनुजा यांची मुलगी आहे. त्यांच्या घरात लहानपणापासूनच फिल्मी बँकराऊंड असले तरी तिच्या आईने तिचे पालनपोषण करताना ती एका अभिनेत्रीची मुलगी आहे याची तिला कधीच जाणीव करून दिली नाही. एका सामान्य मुलाचा ज्याप्रकारे आई सांभाळ करते, तसाच सांभाळ तनुजा यांनी काजोलचा आणि तिची बहीण तनिषाचा केला. काजोलची नुकतीच स्वच्छ आदत स्वच्छ भारत या मोहिमेसाठी ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तिनेच ही गोष्ट तिच्या सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून तिच्या फॅन्सना दिली आहे. स्वच्छतेच्या बाबतीत काजोल लहानपणापासूनच सतर्क आहे आणि याचे श्रेय ती तिच्या आईला देते. 
काजोल स्वच्छतेला अतिशय महत्त्व देते. ती एका श्रीमंत कुटुंबात लहानाची मोठी झाली असल्याने लहानपणापासून तिच्या घरी कामं करण्यासाठी अनेक नोकर होते. पण तरीही तिची आई तनुजा तिला अनेकवेळा घरातला कचरा काढायला लावत असे. तसेच फरशी पुसायला सांगत असे. स्वच्छता ही सगळ्यात गरजेची आहे आणि कोणतेही काम छोटे नसते अशी शिकवण तिच्या आईने तिला या कामांद्वारे दिली. त्यामुळे हीच शिकवण आता काजोल तिच्या मुलांना देत आहे. ती तिच्या मुलांना देखील घरातला केर काढायला लावते. तसेच अनेकवेळा त्यांना फरशी देखील पुसायला सांगते. 

Also Read : ​काजोल म्हणते, ‘लहान मुलांची आई असणे सोपे नाही’!

Web Title: OMG! Kajol can be done by her children after the house chores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.