OMG! केआरके म्हणतो, असा चित्रपट बनवणाऱ्याचे हात छाटायला हवेत!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 03:42 PM2018-11-11T15:42:30+5:302018-11-11T15:44:08+5:30

कमाल राशीद खान अर्थात केआरके याचे आणि वादांचे जुने नाते आहे. त्याचे अख्खे ट्विटर अकाऊंट अशा वाद ओढवून घेणाºया फोटो आणि ट्विटनी भरलेले आहे. अलीकडे केआरकेने आमिर खानच्या ‘ठग्स आॅफ हिंदूस्तान’ची समीक्षा दिली.

OMG! Kamaal Rashid Khan krk thugs of hindostan review is most hilarious | OMG! केआरके म्हणतो, असा चित्रपट बनवणाऱ्याचे हात छाटायला हवेत!!

OMG! केआरके म्हणतो, असा चित्रपट बनवणाऱ्याचे हात छाटायला हवेत!!

googlenewsNext

कमाल राशीद खान अर्थात केआरके याचे आणि वादांचे जुने नाते आहे. त्याचे अख्खे ट्विटर अकाऊंट अशा वाद ओढवून घेणा-या फोटो आणि ट्विटनी भरलेले आहे. अलीकडे केआरकेने आमिर खानच्या ‘ठग्स आॅफ हिंदूस्तान’ची समीक्षा दिली. आपल्या सोशल अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट करत, केआरके ‘ठग्स आॅफ हिंदूस्तान’बद्दल  नाही-नाही ते बोललाय. आमिर खानवर तर त्याने चांगलीच भडास काढली आहे. पूर्ण चित्रपटात केवळ फातिमा सना शेख व अमिताभ बच्चन यांनीच चांगला अभिनय केलाय. आमिरचा अभिनय एकदम बकवास आहे. आमिरने हा चित्रपट का केला, हे तर समजू शकतो. पण अमिताभ बच्चन यांनी हा चित्रपट का स्वीकारावा, कळत नाही, असे केआरके व्हिडिओत म्हणतोय. केवळ इतकेच नाही तर ‘ठग्स आॅफ हिंदूस्तान’चा दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्य यांच्यावरही केआरकेने तोंडसुख घेतले आहे. चित्रपटाचा स्क्रिनप्ले बकवास आहे, आचार्य यांनी स्वत: लिहिलेले चित्रपटाचे डायलॉग्सही तितकेच बकवास आहेत. यासाठी त्यांचे हात छाटायला हवेत. जेणेकरून यानंतर ते असे काही करणार नाहीत. डायरेक्शन असोसिएशनला त्यांचे डायरेक्टर कार्डही वापस घ्यायला हवे, जेणेकरून ते इतका सुमार चित्रपट बनवणार नाहीत, असे केआरकेने म्हटले आहे.


फ्री तिकिट, फ्री कोल्ड ड्रिंक आणि फ्री समोसे मिळत असतील तरीही हा चित्रपट पाहता येणार नाही,असेही केआरके व्हिडिओत म्हणताना दिसतोय. आता केआरकेच्या या इतक्या टोकाच्या निगेटीव्ह फिडबॅकचा प्रेक्षकांवर किती परिणाम होतो, ते बघूच. तूर्तास गत ३ दिवसांत या चित्रपटाने १०० कोटींचा गल्ला जमवला आहे. अर्थात चित्रपटाची कमाई दिवसांगणिक घटताना दिसतेय.

Web Title: OMG! Kamaal Rashid Khan krk thugs of hindostan review is most hilarious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.