OMG...! कियारा आडवाणीच्या आजीने 'लस्ट स्टोरीज'मधील तिचे पाहिले बोल्ड सीन, दिली अशी रिअॅक्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 02:35 PM2019-05-17T14:35:36+5:302019-05-17T14:36:19+5:30
नेटफ्लिक्सवरील वेब सीरिज 'लस्ट स्टोरीज'मधून प्रसिद्धी झोतात येणारी अभिनेत्री कियारा आडवाणी सध्या आगामी चित्रपट 'कबीर सिंग'मुळे चर्चेत आहे.
नेटफ्लिक्सवरील वेब सीरिज 'लस्ट स्टोरीज'मधून प्रसिद्धी झोतात येणारी अभिनेत्री कियारा आडवाणी सध्या आगामी चित्रपट 'कबीर सिंग'मुळे चर्चेत आहे. कियारा आणि शाहिद कपूर चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. नुकतेच कियाराने एका चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी तिथे 'लस्ट स्टोरीज'मधील तिच्या वायब्रेटर सीनबद्दल वारंवार विचारले गेले.
यावेळी कियारा आडवाणीने सांगितले की, 'माझी आजी माझ्यासोबत रहायला आली होती. त्याचवेळी नेटफ्लिक्सवर लस्ट स्टोरीज प्रदर्शित झाली होती. मी माझ्या आजीला ती सीरिज दाखवली. इतकेच नाही तर माझ्या पालकांनीदेखील पाहिली. त्यांना लस्ट स्टोरीज खूप आवडली. माझ्या पालकांना माझ्या त्या सीनमुळे काहीही फरक पडला नाही. कारण या चित्रपटात काम करण्यास होकार दिला त्यावेळी माझ्या घरातल्यांना या सीनबद्दल माहित होते.'
तिने पुढे सांगितले की, 'माझी आजी अँग्लो इंडियन आहे. त्यामुळे तिला काही संदर्भ समजले नाही. ती सिनेमाचे सबटायटल वाचत होती. सगळेच मला हसत होते. मला या सीरिजसाठी वेगवेगळ्या प्रतिक्रिया मिळाल्या. जेव्हा माझी ही सीरिज आजी पहात होती त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर काहीच एक्स्प्रेशन नव्हते. ती पूर्ण ब्लँक होऊन सीरिज पहात होती. त्यावेळी तिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही.'
त्यावेळी मी विचार करत होते की आजीला सीरिज आवडली की नाही? त्यानंतर मी माझ्या आईला आजीला फोन करून सीरिजबद्दल सांगायला सांगितले. आईने तिला त्या सीनबद्दल सांगितले आणि आजीला सीरिज आवडलीदेखील, असे कियारा सांगत होती.
कियारा आडवाणी पहिल्यांदाच शाहिद कपूरसोबत पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप वांगा यांनी केले आहे.
हा चित्रपट २१ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.