OMG:सुनील ग्रोवरसाठी चक्क सलमान खानला करावे लागले हे काम,हा फोटो आहे पुरावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 10:12 AM2018-08-18T10:12:14+5:302018-08-18T10:16:36+5:30
सलमान खान गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाच्या शूटिंग वाट बघत होता. या सिेनमात सलमानसोबत अभिनेत्री कतरिना कैफ दिसणार आहे.
सेलिब्रिटी मंडळी नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. मग ते स्वतःविषयीचं एखादं कारण असो किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीबाबतची गोष्ट. ते नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असतात. आता असाच एक सेलिब्रिटी चर्चेत आला आहे,तो स्वतःमुळे नाही तर त्याच्या या फोटोमुळे. एरव्ही सलमानला पाहताच अनेक जण त्याच्या भोवती एक फोटो काढण्यासाठी गर्दी करतात. मात्र हा फोटो पाहून तुम्हीही विचारात पडला असणार. कारण फोटोत चक्क सलमान खान फोटोग्राफर बनत सुनिल ग्रोव्हरचे विविध पोज कॅमे-यात कॅप्चर करताना दिसतो आहे.‘भारत’ सिनेमात सुनिल ग्रोव्हरही विशेष भूमिकेत झळकणार आहे. सध्या या सिनेमाचे माल्टामध्ये शुटिंग सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण स्टारकास्ट माल्टा येथे शूटिंगमध्ये बिझी आहेत.
तुर्तास सुनील ग्रोवरनेच हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर होताच ट्विटवर एकाहून एक भन्नाट रिप्लाय पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सध्या सुनिल ग्रोवरचाच सोशल मीडियावर बोलबाला असल्याचे पाहायला मिळत आहे. 'भारत' सिनेमाची घोषणा होताच सलमानने एक फोटो पोस्ट केला होता.ज्यात सलमान कॅमेरासमोर दिसत नसून कॅमेऱ्याच्या मागे दिसला. या फोटोला सलमानने समर्पक असे कॅप्शनही दिले होते, ''चांगला फोटो काढण्यासाठी फोकस करावा लागतो. तशी तर ही गोष्ट आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी लागू पडते.'' असे त्याने म्हटले होते.
सलमान खान गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाच्या शुटिंगची वाट बघत होता. या सिेनमात सलमानसोबत अभिनेत्री कतरिना कैफ झळकणार आहे. तसेच दिशा पटानी, तब्बू, नोरा फतेही हे कलाकारही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. २०१४ साली प्रद्रशित झालेला दक्षिण कोरियाई चित्रपट 'ओड टू माई फादर'मधून प्रेरणा घेऊन 'भारत' सिनेमा बनवण्यात आला आहे. या सिनेमात जॅकी श्रॉफ सलमानच्या पित्याच्या भूमिकेत आहे. यापूर्वी सलमान व जॅकी ‘वीर’मध्ये एकत्र दिसले होते. 'भारत' चित्रपटाची कथा १९४७ म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल. भारत नावाच्या एका सामान्य व्यक्तिची कथा यात दिसेल. मी परतलो नाही तर तू कुटुंबाचा सांभाळ करशील, असे भारतचे वडिल फाळणीच्या काळात स्थलांतर करताना भारतला सांगतात. या कथेत भारतचा ५० वर्षांचा प्रवास दाखवला जाणार असल्याने प्रत्येक दहा वर्षांच्या अंतराने सलमानचे लूक बदलताना दिसेल. हा सिनेमा २०१९ला ईदमध्ये प्रदर्शित होणार आहे.