OMG : राणी मुखर्जीने आदित्य चोप्राला म्हटले लूजर, हे होते कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2018 10:58 AM2018-02-24T10:58:37+5:302018-02-24T16:28:37+5:30
बॉलिवूडची मर्दानी राणी मुखर्जीचा आगामी चित्रपट 'हिचकी' लवकरच रिलीज होणार आहे. लग्नानंतर आणि राणी आई झाल्यानंतर राणी चित्रपटात पुनरागमन ...
ब लिवूडची मर्दानी राणी मुखर्जीचा आगामी चित्रपट 'हिचकी' लवकरच रिलीज होणार आहे. लग्नानंतर आणि राणी आई झाल्यानंतर राणी चित्रपटात पुनरागमन करता आहे. ती या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करते आहे. प्रमोशन दरम्यान राणीने पती आदित्या चोप्राबाबत एक वक्तव्य केले आहे.
तू आदित्य चोप्राच्या चित्रपटात का काम करत नाही हा प्रश्न जेव्हा राणी ला विचारला गेला तेव्हा ती म्हणाली "मला नाही माहीत तो मला घेऊन चित्रपट का नाही तयार करत. मी नेहमीच त्याला ह्याबद्दल विचारत असते. पण माझ्यासोबत काम करायचे की नाही हा त्याचा प्रश्न आहे आणि मी यावर काहीच करु शकत नाही.
राणी पुढे म्हणली की ती ह्या गोष्टींवर आदित्यशी घरी चर्चा करत असते की, " हो मी नेहमीच याबद्दल बोलते आणि मी नेहमी मस्करीत त्याला म्हणते की तू लुजर आहेस म्हणून मला तुझ्या चित्रपटात घेत नाहीस, खरंतर आदित्य असा दिग्दर्शक आहे जो पटकथेनुसार अभिनेत्रीची निवड करतो.
ALSO READ : राणी मुखर्जी सांगतेय या व्यक्तीमुळे ती आली अभिनयक्षेत्रात
हिचकी चित्रपटात राणी मुखर्जी नैना माथूर नावाच्या मुलीची भूमिका साकारते आहे. नैनाला टॉरेट सिंड्रोमने नावाच्या आजाराने ग्रासलेले असते. त्यामुळी ती बोलताना अडखळते आणि एकच वाक्य दोन वेळा बोलते. तसेच बोलता बोलता विचित्र आवाज काढते, तिच्या या सवयीमुळे तिच्या आयुष्यात काशी आव्हान येतात आणि त्यांना ती कशी सामोरे जाऊन ती मात करते हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. त्याच बरोबर समाजात कमजोर व्यक्ती आणि कणखर व्यक्ती ह्यात चालू असलेला भेदभाव यात दिसून येईल. नैनाची शिक्षिका बनायची इच्छा आहे पण तीच्या आजारपणा मुळे ती शिक्षिका होऊ शकत नाही हे तिला सांगण्यात येते. इथून पुढे तिच्या संघर्षाची गोष्ट सुरु होते. महेश शर्मा निर्मित आणि सिद्धार्थ पी मल्होत्रा दिग्दर्शित हा चित्रपट २३फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.