OMG! तोकड्या कपड्यांमुळे मीरा राजपूत झाली होती ट्रोल, लोक म्हणाले - 'मुलीचा स्कर्ट घातलास की काय?'
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 17:57 IST2020-06-03T17:57:03+5:302020-06-03T17:57:53+5:30
मीरा राजपूतच्या मिनी स्कर्ट घालणं आलं होतं अंगाशी

OMG! तोकड्या कपड्यांमुळे मीरा राजपूत झाली होती ट्रोल, लोक म्हणाले - 'मुलीचा स्कर्ट घातलास की काय?'
बॉलिवूडचा कबीर सिंग म्हणजेच शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत कोणत्या सेलिब्रेटीपेक्षा कमी नाही. तीदेखील इतर सेलिब्रेटींच्या इतकीच ग्लॅमरस व बोल्ड आहे. त्यामुळे बऱ्याचदा ती तिच्या गेटअप व फोटोंमुळे चर्चेत येत असते.असेच एकदा मीरा तिची मुलगी मिशा कपूरला आणण्यासाठी शाळेत गेली होती.
खरेतर मीरा राजपूत आपल्या मुलांची काळजी घेण्यात अजिबात कसर ठेवत नाही. त्यामुळे सामान्य पालकांप्रमाणे मीरादेखील मुलांना आणायला त्यांच्या शाळेत जाते. तसेच मार्केटमध्येदेखील जाते. काही दिवसांपूर्ली जेव्हा मीरा बाहेर स्पॉट झाली होती. त्यावेळी तिचे कपडे पाहून लोक भडकले होते.
त्यावेळी मीशाचा हात पकडून जाताना मीरा दिसली होती. त्यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला होता. त्यासोबत तिने कॉटनचा ब्राइट यलो रंगाचा मिनी स्कर्ट घातला होता. तसे तिचे कपडे सीझननुसार होते. पण लोकांना तिचा हा गेटअप फारसा पटला नाही.
सोशल मीडियावर मीराचे या आऊटफिटमधील फोटो व्हायरल झाल्यानंतर युजर्सने तिला खूप ट्रोल केले होते. तिला कपडे परिधान करताना सतर्क रहा, असे सल्ले दिले होते. इतकंच नाही तर काहींनी मीराने तिच्या मुलीचा स्कर्ट परिधान केला आहे, अशीदेखील कमेंट केली होती.
अशा कमेंट्सचा मीरा राजपूतला अजिबात फरक पडत नाही. ती निगेटिव्ह कमेंटकडे दुर्लक्ष करते आणि तिला जे वाटते तेच ती करते.