OMG : ५३ वर्षीय सोनू वालियाला पाठविले अश्लील व्हिडीओ, गुन्हा दाखल!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2017 10:58 AM2017-03-04T10:58:44+5:302017-03-04T16:29:17+5:30

बॉलिवूड अभिनेत्री सोनू वालिया हिच्याशी छेडछाड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी वालियाने मुंबई येथील बांगुरनगर पोलीस ठाण्यात ...

OMG: Porn video sent to 53-year-old Sonu Walia; | OMG : ५३ वर्षीय सोनू वालियाला पाठविले अश्लील व्हिडीओ, गुन्हा दाखल!

OMG : ५३ वर्षीय सोनू वालियाला पाठविले अश्लील व्हिडीओ, गुन्हा दाखल!

googlenewsNext
लिवूड अभिनेत्री सोनू वालिया हिच्याशी छेडछाड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी वालियाने मुंबई येथील बांगुरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 



दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये सोनू वालियाने सांगितले की, कोणीतरी अनोळखी व्यक्ती मला गेल्या काही दिवसांपासून फोन करून त्रास देत आहे. त्याने मला अश्लील व्हिडीओही पाठविले आहेत. हा सिलसिला गेल्या आठवड्याभरापासून सुरू असून, मी अक्षरश: या प्रकाराने त्रस्त झाली आहे. विशेष म्हणजे मी त्या व्यक्तीला वारंवार धमकावले आहे. परंतु तिचा दिनक्रम सुरूच असल्याने मी पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. 

दरम्यान, बांगरनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीश गायकवाड यांच्या मते, सोनू वालिया यांना वेगवेगळ्या मोबाइल नंबरवरून संबंधित व्यक्तीने संपर्क करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या हे सर्व नंबर बंद आहेत. आम्ही याविषयीचा संपूर्ण तपास करीत असून, लवकरच संबंधित गुन्हेगाराला पकडण्यात यश येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 



५३ वर्षीय अभिनेत्री सोनू वालिया हिचे बॉलिवूडमध्ये चांगले योगदान राहिले आहे. सध्या ही अभिनेत्री इंडस्ट्रीपासून दूर असून, मलाडस्थित घरात वास्तव्य करीत आहे. अचानकपणेच असा प्रकार सुरू झाल्याने सुरुवातीला सदर अभिनेत्री प्रचंड घाबरून गेली होती. काही दिवस फोनचा सिलसिला सुरू होता. त्यानंतर अश्लील व्हिडीओही पाठविले गेल्याने सोनू वालियाने पोलिसांत तक्रार करणे योग्य समजले. सध्या संबंधित आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. 

Web Title: OMG: Porn video sent to 53-year-old Sonu Walia;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.