OMG !! प्रभासला या बॉलिवूड अभिनेत्रीवर आहे सीक्रेट क्रश!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2017 09:52 AM2017-05-09T09:52:33+5:302017-05-09T15:45:12+5:30
‘बाहुबली2’चे अभूतपूर्व यश पाहून सगळेच थक्क आहेत. हॉलिवूडही या चित्रपटाच्या यशाने हैरान झाले आहे. एकीकडे या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव ...
‘ ाहुबली2’चे अभूतपूर्व यश पाहून सगळेच थक्क आहेत. हॉलिवूडही या चित्रपटाच्या यशाने हैरान झाले आहे. एकीकडे या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत असताना दुसरीकडे या चित्रपटाचा अभिनेता प्रभास याचेही वारेमाप कौतुक होत आहे. प्रभासच चार्म पाहून जगभरातील मुली त्याच्यावर फिदा आहेत. कदाचित हेच कारण आहे, प्रभासला आत्तापर्यंत लग्नाचे ६ हजार प्रस्ताव आले आहेत. आत्तापर्यंत प्रभासने लग्नाबद्दल काहीही विचार केला नव्हता. पण प्रभास आधीच एका बॉलिवूड अभिनेत्रीला हृदय देऊन बसलाय. होय, लाखो-करोडो मुलींचे हृदय चोरणारा प्रभास एका बॉलिवूड अभिनेत्रीवर मरतो. खुद्द प्रभासने एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. ही बॉलिवूड अभिनेत्री कोण, हे ऐकायला तुम्ही उत्सूक असाल तर ती अभिनेत्री आहे, दीपिका पादुकोण.
प्रभासला दीपिका पादुकोणवर सीक्रेट क्रश आहे. मला दीपिका प्रचंड आवडते, असे प्रभासने अगदी बेधडक सांगितले ते म्हणूनच. दीपिका मला खूप आवडते. तिच्यासोबत एक जरी चित्रपट करता आला तर मला आवडेल, असेही त्याने सांगितले.
आता या सगळ्यावर दीपिका कशी रिअॅक्ट करते, ते पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे. ‘बाहुबली’पूर्वी प्रभास व अभिनेत्री अनुष्का शेट्टी या दोघांच्या अफेअरची चर्चा रंगली होती. हे दोघे लवकरच लग्न करणार, अशीही चर्चा होती. यानंतर अगदी अलीकडे ‘बाहुबली2’ रिलीज झाल्यानंतर प्रभासच्या लग्नाचा बार उडणार, अशीही बातमी आली होती. प्रभासने स्वत:साठी वधू निवडली असून लग्नाची तारीखही जवळपास ठरलेली असल्याचे यात म्हटले गेले होते. अर्थात प्रभासची होणारी वधू कोण, कुठली? हे कळू शकलेले नव्हते.