OMG!! राणी मुखर्जीनेही केली सलमान खानसारखीच ‘चोरी’!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 10:22 AM2017-12-21T10:22:16+5:302017-12-21T15:52:16+5:30
राणी मुखर्जीच्या ‘हिचकी’ या चित्रपटाचा काल-परवा रिलीज झालेला ट्रेलर आपण पाहिला असेलच. अनेकांना हा ट्रेलर आवडलाही. पण ‘शोधी’ लोकांनी ...
र णी मुखर्जीच्या ‘हिचकी’ या चित्रपटाचा काल-परवा रिलीज झालेला ट्रेलर आपण पाहिला असेलच. अनेकांना हा ट्रेलर आवडलाही. पण ‘शोधी’ लोकांनी राणीची चोरी लगेच पकडली. होय, ‘हिचकी’चा ट्रेलर एका हॉलिवूड चित्रपटाची हुबेहुब कॉपी असल्याचे त्यांनी शोधून काढले. हा हॉलिवूड चित्रपट कुठला तर ‘फ्रंट आॅफ द क्लास’.
हॉलिवूडच्या या चित्रपटात एका टॉरेट सिंड्रोमने ग्रस्त तरूणाची कथा आहे. या आजारामुळे तो बोलण्यात अडखळतो. पण या कमतरतेवर मात करत तो सगळ्यांचा आवडता टीजर बनतो. नेमकी हीच कथा ‘हिचकी’मध्ये दिसणार आहे. फरक इतकाच याठिकाणी हिरो नाही तर हिरोईन म्हणजेच राणी मुखर्जी टॉरेट सिंड्रोमने आजारी दिसतेय. ‘फ्रंट आॅफ द क्लास’ हा चित्रपट ब्रॅड कोहेनच्या कादंबरीवर आधारित चित्रपट होता. ‘हिचकी’चाट्रेलर ‘फ्रंट आॅफ द क्लास’चा कॉपी असल्याचे उघड झाल्यावर आधी यशराज बॅनरने हे वृत्त नाकारले होते. आमचा हा चित्रपट कॉपी नाहीच, असे यशराजने म्हटले होते. पण ‘हिचकी’चे दिग्दर्शक सिद्धार्थ पी. मल्होत्रा यांनी मात्र कॉपीचा आरोप अप्रत्यक्षपणे मान्य केलाआहे. आमच्याकडे ब्रॅड कोहेन यांच्या पुस्तकाचे हक्क आहेत, असे त्यांनी सांगितलेयं.
एकंदर काय तर यावेळी यशराजने सलमान खानच्या चुकीची पुनरावृत्ती टाळली,असेच म्हणायला हवे. कारण ‘ट्युबलाईट’ हा चित्रपट ‘लिटल बॉय’ या हॉलिवूडपटाची कॉपी आहे, हे आधीच स्पष्ट झाले होते. पण सलमान हे मानायलाच तयार होईना. अर्थात सरतेशेवटी त्याला ही गोष्ट मानावीच लागली होती. आता ‘ट्युबलाईट’ची बॉक्सआॅफिसवर काय गत झाली होती, ते आपल्याला ठाऊक आहेच. ‘हिचकी’बद्दल असे होऊ नये म्हणजे मिळवले, असेच तूर्तास म्हणावे लागेल.
ALSO READ : trailer out : राणी मुखर्जीच्या ‘हिचकी’चा ट्रेलर असा तर चित्रपट कसा असेल?
‘हिचकी’च्या ट्रेलरबद्दल सांगायचे तर, यात राणीने टॉरेट सिंड्रोमने पीडित असलेल्या महिलेची भूमिका साकारली आहे. यात व्यक्तिला सतत उचकी लागते. त्यामुळे ‘हिचकी’च्या ट्रेलरमध्येही राणी अनेकदा ‘हिचकी’ घेताना दिसते.