OMG!! रति अग्निहोत्री व तिच्या पतीने केली ‘चोरी’!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2017 11:39 AM2017-01-20T11:39:16+5:302017-01-20T11:40:51+5:30
‘एक दुजे के लिए’ या सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करणारी आणि पुढे मोठ्या पडद्यावर आपल्या दिलखुलास अदांनी प्रेक्षकांना रिझवणारी ...
‘ क दुजे के लिए’ या सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करणारी आणि पुढे मोठ्या पडद्यावर आपल्या दिलखुलास अदांनी प्रेक्षकांना रिझवणारी अभिनेत्री रति अग्निहोत्री सध्या चर्चेत आहे. होय, रति व तिचे पती अनिल विरवानी यांच्याविरूद्ध ४८.९६ लाख रूपयांची वीज चोरी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री व तिच्या पतीने कथितरित्या मुंबईच्या वरळी भागातील स्टर्लिंग सी फेस अपार्टमेंटमधील आपल्या घराच्या वीजेच्या मीटरशी छेडछाड केली होती. बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व वितरणच्या एका धडक कारवाई पथकाने अभिनेत्रीच्या घरातील वीज मीटर तपासल्यानंतर या चोरीचा छडा लागला. ४ एप्रिल २०१३ पासून १ लाख ७७ हजार ६४७ युनिट वीजेसाठी कथितरित्या वीज भरणा करण्यात आलेला नव्हता. रति व तिच्या पतीविरूद्ध वरळी पोलिस ठाण्यात भारतीय वीज अधिनियमाच्या कलम १३५ अंतर्गत ४८.९६ लाख रूपयांच्या वीज चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आहे. या प्रकरणाचा तूर्तास तपास सुरु आहे.
रति अग्निहोत्री व तिचे पती अनिल विरवानी
रति तिच्या कुटुंबासोबत या स्टर्लिंग सी फेस अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये राहतेय. सूत्रांच्या मते, रति व तिचा पती दोन वर्षांपूर्वी विभक्त झालेत. १९८१ साली ‘एक दुजे के लिए’ या सिनेमाद्वारे रतिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. या पहिल्याच चित्रपटाने रतिला रातोरात स्टार बनवले. हा चित्रपट तुफान गाजला. यानंतर रतिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये चरित्र अभिनेत्रीची भूमिका केलीय. लग्नानंतर रतिने एक मोठ्ठा ब्रेक घेतला. यानंतर तब्बल सोळा वर्षांनी ‘कुछ खट्टी, कुछ मीठी’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले. या चित्रपटात तिने काजोलच्या ग्लॅमरस आईची भूमिका साकारली होती.अलीकडच्या काळात‘शादी के साइड इफेक्ट्स’,‘सिंह इज ब्लिंग’ यासारख्या सिनेमात रति अलीकडे दिसली होती. रतिला तनूज नावाचा एक मुलगा आहे. ‘लव्ह यू सोनीयों’ या चित्रपटातून तनूजने बॉलिवूड डेब्यू केला होता.
रति व तनूज