अबब ! 'छोट्या अमिताभची' मोठी कमाई, उद्योगातून होतेय 300 कोटींची उलाढाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 06:48 PM2021-04-12T18:48:52+5:302021-04-12T18:55:14+5:30
Ravi Valecha Who Played Young Amitabh Bachchan In Coolie: सिनेमात छोटा अमिताभची भूमिका साकारणारा बालकलाकार रवी वलेचाने करिअरसाठी अभिनय क्षेत्राची निवड न करता, त्याचा व्यवसाय सुरु केला.
हिंदी चित्रपटसृष्टीचे शहेनशाह महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबर एकदा तरी काम करता यावे असे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. मात्र असा एक कलाकारा होता ज्याने अमिताभ बच्चन यांची लहानपणीची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारत रसिकांची वाहवा मिळवली. हिंदी चित्रपटसृष्टीचे शहेनशाह महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत बालकलाकार रवी वलेचाने रसिकांची भरघोस पसंती मिळवली होती.
८० आणि ९० दशकात अनेक बालकलाकार प्रसिद्धीच्या शिखरावर होते. त्यातला एक बालकलाकार ज्याने अमिताभ बच्चन यांच्या लहानपणीची भूमिका केली तो बालकलाकार रवी वलेचा तुम्हालाही नक्कीच आठवत असेल. मात्र आज मोठा झाल्यानंतर तो नेमका काय करतोय याबाबतची फारशी माहिती कोणालाही नाहीय. बालपणीच आपल्या अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा रवीने ‘देश प्रेमी’, ‘शक्ती’, ‘कूली’, ‘अमर अकबर अँथोनी’ सारख्या बऱ्याच सिनेमांमध्ये अमिताभची व्यक्तिरेखा साकारली होती.
— Ravi Valecha (@ravivalecha) April 4, 2019
तब्बल 300हून अधिक सिनेमांत बालकलाकाराची भूमिका साकारणाऱ्या रवी अचानक चंदेरी दुनियेपासून दूर गेला. सिनेमात नंतर त्याचे रसिकांना दर्शन झालंच नाही. शिक्षणावर लक्षकेंद्रित करता यावे म्हणून त्याने सिनेसृष्टीला राम राम ठोकल्याचे बोलले जाते. त्यानंतर त्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. रवी वालेचाने बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात चुनूक दाखवली असली तरी आज वेगळ्याच क्षेत्रात त्याने आपले नाव कमावले आहे.
सिनेमात छोटा अमिताभची भूमिका साकारणारा बालकलाकार रवी वलेचाने करिअरसाठी अभिनय क्षेत्राची निवड न करता, त्याचा व्यवसाय सुरु केला. बघता -बघता छोटा अमिताभ आज ३०० कोटींचा मालक बनला आहे. वाचून नक्कीच आश्चर्य वाटले असणार पण रवी वालेचाने बालकालाकार म्हणून प्रसिद्धी मिळवली असली तरी तो आज एक मोठा व्यावसायिक बनला आहे.अहमदाबादच्या नॅशनल इन्स्टिट्यूटमधून एमबीएची त्याने पदवी घेतली. त्यानंतर स्वत:ची कंपनी सुरू केली. हॉस्पिटॅलिटीच्या क्षेत्रात आज रवी वलेचा मोठे नाव बनले आहे. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आज त्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.