OMG...! टायगर व दिशा पटानीच्या नात्याबाबत जॅकी श्रॉफ यांनी केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 18:49 IST2019-03-12T18:48:30+5:302019-03-12T18:49:12+5:30
अभिनेत्री दिशा पटानी आणि अभिनेता टायगर श्रॉफ रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा बऱ्याच काळापासून सुरू आहे.

OMG...! टायगर व दिशा पटानीच्या नात्याबाबत जॅकी श्रॉफ यांनी केला खुलासा
अभिनेत्री दिशा पटानी आणि अभिनेता टायगर श्रॉफ रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा बऱ्याच काळापासून सुरू आहे. बऱ्याचदा ते दोघे एकत्र दिसतात. त्या दोघांनी आपल्या नात्याबद्दल खुलासा केलेला नाही. मात्र नुकतेच टायगरचे वडील म्हणजेच बॉलिवूडचा जग्गू दादा जॅकी श्रॉफने त्यांच्या नात्याबाबत खुलासा केला आहे.
जॅकी श्रॉफने टायगर व दिशा पटानीच्या नात्याबद्दल सांगितले की, टायगरच्या आयुष्यात तिच्या रुपाने एक चांगली मैत्रीण आली आहे. डान्स आणि व्यायाम ही दोघांचीही आवड आहे. दोघेही एकत्र ही आवड जोपासतात. तिचे वडील सैन्यात होते. त्यामुळे शिस्तीचे महत्त्व तिला माहित आहे. ते दोघंही भविष्यात लग्न करतील किंवा आयुष्यभर एकमेकांचे खास मित्रही राहतील. त्यांच्या नात्याबद्दल आता काहीच सांगता येत नाही.
टायगर व दिशा दीर्घकाळापासून एकमेकांसोबत आहेत. दोघेही अनेकदा लंच व डिनर डेट एन्जॉय करताना दिसतात. एकत्र सुट्टीही घालवतात. पण नात्यावर बोलायला ते अद्यापही तयार नाहीत.
कदाचित ती वेळ अजून यायचीय, असेच म्हणायला हवे. सध्या टायगर ‘स्टुडंट आॅफ द ईअर 2’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटात तो अनन्या पांडे व तारा सुतारियासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय त्याने ‘बागी 3’चीही घोषणा केलीय. मार्च २०२० मध्ये ‘बागी 3’ प्रदर्शित होणार आहे.