OMG! सलमान खानला सतावू लागली ‘भारत’च्या लांबीची चिंता!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 08:33 PM2018-10-26T20:33:30+5:302018-10-26T20:34:01+5:30

‘बिग बॉस 12’ शिवाय सलमान खान सध्या ‘भारत’ या चित्रपटातही बिझी आहे. याच चित्रपटाबद्दलची एक ताजी बातमी म्हणजे, ‘भारत’मुळे सलमान काहीसा चिंतीत आहे.

OMG! is salman khan worried about the length of the film bharat | OMG! सलमान खानला सतावू लागली ‘भारत’च्या लांबीची चिंता!!

OMG! सलमान खानला सतावू लागली ‘भारत’च्या लांबीची चिंता!!

googlenewsNext

‘बिग बॉस 12’ शिवाय सलमान खान सध्या ‘भारत’ या चित्रपटातही बिझी आहे. पुढीलवर्षी ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज होणार आहे. अबुधाबी, माल्टा अशा अनेक देशात या चित्रपटाचे शूटींग होत आहे. याचा अर्थ चित्रपटात अनेक सुंदर लोकेशन्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. शिवाय सलमान खान व कॅटरिना कैफ या दोघांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना पाहता येणार आहे. याच चित्रपटाबद्दलची एक ताजी बातमी म्हणजे, ‘भारत’मुळे सलमान काहीसा चिंतीत आहे. होय, एकीकडे चित्रपटाच्या वाढत्या लांबीमुळे सलमानची चिंता वाढली आहे. पावणे तीन तासांत चित्रपट गुंडाळला जावा, अशी सलमानची इच्छा आहे. तर दुसरीकडे दिग्दर्शक अली अब्बास जफर कुठल्याही स्थितीत चित्रपटाच्या कथेबद्दल तडजोड करायला तयार नाही. हा चित्रपट ३ तासांच्या वर जाईल, असे अली अब्बासला वाटते आहे. चित्रपटाची लांबी वाढेल, या चिंतेने कथेत कुठलाही काटछाट करायला तो तयार नाही.
आता सलमान आणि अली अब्बास यावर काय तोडगा काढतात, ते बघूच.
‘भारत’ हा चित्रपट ‘आॅड टू माई फादर’ या कोरियन चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे़ यात सलमान २० ते ६० वयाचे अनेक टप्पे साकारताना दिसणार आहे़ म्हणजेच सलमानचे वेगवेगळे लूक्स प्रेक्षकांना पाहता येणार आहेत़ प्राप्त माहितीनुसार, सिनेमाची कथा १९४७ म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल. भारत नावाच्या एका सामान्य व्यक्तिची कथा यात दिसेल. मी परतलो नाही तर तू कुटुंबाचा सांभाळ करशील, असे भारतचे वडिल फाळणीच्या काळात स्थलांतर करताना भारतला सांगतात. या कथेत भारतचा ५० वर्षांचा प्रवास दाखवला जाणार असल्याने प्रत्येक दहा वर्षांच्या अंतराने सलमानचे लूक बदलताना दिसेल. यातले एक लूक मॉडर्न असेल. याकाळात त्याला कॅटरिना व त्याचे प्रेम होईल आणि नंतर लग्न.   
सिनेमाच्या कथेनुसार, सलमानला आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी सर्कशीत काम करावे लागते. यात तो ‘मौत का कुआँ’मध्ये मोटरसायकलवर चित्तथरारक कसरती करताना दिसेल. त्याच्यासोबत या काळात दिशा पाटनीही दिसेल. दिशाने यात सलमानच्या बहिणीची भूमिका साकारली असल्याचे कळतेय.

Web Title: OMG! is salman khan worried about the length of the film bharat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.