OMG!! ‘मोहंजोदाडो’मधील पूजाच्या लूकवर अशीही टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2016 11:51 AM2016-06-19T11:51:03+5:302016-06-19T17:28:31+5:30

अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री पूजा हेगडे यांचा आगामी चित्रपट म्हणजे ‘मोहंजोदाडो’. या चित्रपटातील पूजा हेगडेचा फर्स्ट लूक नुकताच ...

OMG !! Such criticism on the worship lover of 'Mohanjodado' | OMG!! ‘मोहंजोदाडो’मधील पूजाच्या लूकवर अशीही टीका

OMG!! ‘मोहंजोदाडो’मधील पूजाच्या लूकवर अशीही टीका

googlenewsNext

/>अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री पूजा हेगडे यांचा आगामी चित्रपट म्हणजे ‘मोहंजोदाडो’. या चित्रपटातील पूजा हेगडेचा फर्स्ट लूक नुकताच आऊट झाला. या पिरियड ड्रामासाठी  बराच रिसर्च केला असल्याचा दावा दिग्दर्शक आशूतोष गोवारीकर याने केला आहे. मात्र इतिहासाच्या काही जाणकारांना आशुतोषचा हा दावा अजिबात पटलेला नाही. किमान पूजाचे लूक पाहून तरी आशूतोषचा दावा या जाणकारांना फोल वाटतो आहे. ‘मोहंजोदाडो’ मधील पूजाच्या लूकवर टिष्ट्वटरवर बरीच टीका होताना दिसत आहे. जेएनयूमध्ये इतिहासात एम. फिल करणारी रूचिका शर्मा हिने पूजाच्या लूकमध्ये अनेक कमतरता असल्याचे म्हटले आहे. Twitterवर तिने याबाबत tweets केले आणि बघता बघता हे tweets क्षणात व्हायरल झालेत. हे कुठले अ‍ॅटिट्यूड? असा प्रश्न रूचिकाने केला आहे. हडप्पा संस्कृतीतील लोक आपल्या केसांमध्ये असे पंख लावत होते का? असा सवालही तिने केला आहे.

गोºया रंगाला दिलेले प्राधान्य यावरही रूचिकाने टीका केली आहे. हड्डपाच्या लोकांचा रंग गडद होता. हे काय, फेअर अ‍ॅण्ड लव्हली बॉईज आहेत? आर्य गोरे होते, हडप्पन लोक नाहीत, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण गोºया रंगाशिवाय बॉलिवूडचे काम भागत नाही..बकवास, असे रूचिकाने लिहिले आहे.


आदिवासी आणि प्राचीन समुदायाच्या लोकांना पडद्यावर दाखविण्याच्या बॉलिवूडच्या तºहांना वैतागले आहे. केसांमध्ये पंख आणि चेहºयांवर विविध रंगांच्या रेघोट्या असेच बॉलिवूड दाखवत आले आहे. हडप्पा संस्कृतीतील टेराकोटाच्या अनेक मूर्ती आहेत. यावरून हडप्पाच्या महिला कशा होत्या, याबद्दल आयडिया मिळू शकली नसती का? असा प्रश्नही रूचिकाने केला आहे.
 

Web Title: OMG !! Such criticism on the worship lover of 'Mohanjodado'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.