OMG! सुहाना खानच्या पहिल्या फोटोशूटने खवळला सोशल मीडिया; दिल्या अशा प्रतिक्रिया!!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2018 11:21 AM2018-08-01T11:21:40+5:302018-08-01T11:22:36+5:30
सुहानाच्या या पहिल्या-वहिल्या फोटोशूटचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागलेत. या फोटोशूटमधील सुहानाचा स्टनिंग अवतार पाहून अनेक जण तिच्या प्रेमात पडले. अनेकांनी तिचे कौतुक केले. अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्यात. मात्र ...
शाहरूख खानची मुलगी सुहाना खान हिने बॉलिवूडच्या दिशेने पहिले पाऊल टाकले, असे समजायला हरकत नाही. जगप्रसिद्ध वोग इंडिया या फॅशन मॅगझिनच्या ताज्या अंकाच्या कव्हर पेजवर सुहाना झळकली आणि सगळीकडे तिचीच चर्चा रंगली. सुहानाच्या या पहिल्या-वहिल्या फोटोशूटचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागलेत. या फोटोशूटमधील सुहानाचा स्टनिंग अवतार पाहून अनेक जण तिच्या प्रेमात पडले. अनेकांनी तिचे कौतुक केले. अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्यात. मात्र या सगळ्यांत सुहानाचा ग्लॅम वर्ल्डमधील हा डेब्यू पाहून नाक मुरडणारेही बरेच निघाले. मग काय, सुहानाच्या निमित्ताने पुन्हा एका नेपोटिजम अर्थात बॉलिवूडमधील घराणेशाहीवरून चर्चा सुरु झाली.
Holding her in my arms again thanks to Vogue. ‘What imperfect carriers of love we are...” except when it comes to our children. So sending u all my love & a big hug. Hello Suhana Khan! pic.twitter.com/RrkhJ8kfz5
— Shah Rukh Khan (@iamsrk) July 31, 2018
बॉलिवूडमधील घराणेशाहीचे आणखी एक मोठे उदाहरण, असे म्हणून लोकांनी सुहानाच्या या फोटाशूटवर टीका केली.
So why is Suhana Khan on the cover of Vogue? Give me one solid reason. Okay, even if is vaguely solid, that’s fine as well. #Bollywood#nepotism
— bodhisatya (@bbthakur) August 1, 2018
वोग इंडियाच्या कव्हर पेजवर सुहाना खानचं का? यासाठी एक तरी समर्पक कारण द्या, असे काही युजर्सनी म्हटले. तर वोग इंडियाचा दर्जा दिवसेंदिवस खालावत असल्याचे काहींनी म्हटले.
Really don't believe in celebrity bashing, but why is Suhana Khan is on the cover of Vogue?
— Srishti (@Srishtea_) July 31, 2018
Technically this isn't even celebrity bashing, because she's not one, her father is.
My dad is an accountant, will ICAI put me on their monthly magazine cover?
माझे डॅड सुपरस्टार नाहीत, अकाऊंटंट आहेत, मला वोगच्या कव्हर पेजवर संधी मिळेल का? असा खोचक प्रश्न एका युजरने विचारला. अनेकांनी सुहानाच्या दिसण्यावरही टीका केली. किंगखान शाहरूखची मुलगी असण्यापलीकडे सुहानाकडे काहीही पात्रता नाही, असे अनेकांनी म्हटले.
suhana khan got a vogue cover? for what? for being a star kid? pic.twitter.com/pAs3n9lY25
— meya (@CineCaffeine) July 31, 2018
एकंदर काय तर सुहानाच्या पहिल्या फोटोशूटचे जितके कौतुक झाले, त्यापेक्षा अनेकपटीने टीकाही. सुहाना या टीकेला कशी तोंड देते, ते येत्या काळात आपण बघणार आहोच.