OMG! सुपरस्टार मोहनलाल यांना ओळखणेही झाले कठीण !!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 05:50 AM2017-12-18T05:50:45+5:302017-12-18T11:20:45+5:30

सुपरस्टार मोहनलाल यांना कोण ओळखत नाही. मल्याळम चित्रपटसृष्टीतील या महान अभिनेत्याने आजपर्यंत अनेक अजरामर सिनेमे दिलेत. ‘वानाप्रस्तम’ या मल्याळम ...

OMG! Superstar Mohanlal was also known hard! | OMG! सुपरस्टार मोहनलाल यांना ओळखणेही झाले कठीण !!

OMG! सुपरस्टार मोहनलाल यांना ओळखणेही झाले कठीण !!

googlenewsNext
परस्टार मोहनलाल यांना कोण ओळखत नाही. मल्याळम चित्रपटसृष्टीतील या महान अभिनेत्याने आजपर्यंत अनेक अजरामर सिनेमे दिलेत. ‘वानाप्रस्तम’ या मल्याळम चित्रपटात मोहनलाल यांनी कथकली कलाकाराची भूमिका साकारली होती. केवळ ८ वर्षांचे अथक प्रयत्न व निष्ठा यांनीच कथकलीचा अभ्यास व अभिनय आत्मसात केला जाऊ शकतो, असे म्हटले जाते. पण मोहनलाल यांनी केवळ सहा महिन्यात ही कला आत्मसात करत ‘वानाप्रस्तम’ मध्ये एक अद्भूत व असामान्य कथकली कलाकार उभा करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी आपल्या चाहत्यांना असाच एक धक्का दिला आहे. होय, सध्या मोहनलाल यांना ओळखणेही कठीण झाले आहे. अलीकडे एका इव्हेंटमध्ये मोहनलाल यांना पाहून अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. सामान्यत: मोहनलाल नेहमीच पिळदार मिशी आणि दाढी अशाच लूकमध्ये दिसतात. पण या इव्हेंटमध्ये क्लिन शेव, पिळदार शरीर, बदलेली हेअरस्टाईल अशा वेगळ्याच रूपात मोहनलाल दिसले. केवळ इतकेच नाही तर सर्वांनाच ते आधीपेक्षा किती तरी तरूण भासले. त्यांचे ते बदललेले रूपडे पाहून, हेच ते मोहनलाल का? असाच प्रश्न अनेकांना पडला. पण होय, ते मोहनलालच होते. त्यांचा हा बदलेलला लूक गेल्या ५१ दिवसांच्या मेहनतीचा परिणाम आहे. गत ५१ दिवसांत मोहनलाल यांनी तब्बल १८ किलो वजन कमी केलेयं. काही इंटरनॅशनल ट्रेनरच्या मदतीने त्यांनी स्वत:त हा बदल आणला. 



ALSO READ : केआरकेने मोहनलाल यांना म्हटले छोटा भीम...वाचा काय आहे, नेमके प्रकरण!

सूत्रांचे खरे मानाल तर गत ५१ दिवसांत त्यांनी योग, कार्डिओ आणि डाएट या माध्यमातून १८ किलो वजन कमी केले. आज मोहनलाल यांना ओळखणेही कठीण झालेय, त्यामागचे हेच खरे कारण आहे. लवकरच ‘Odiyan’ हा मोहनलाल यांचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी मोहनलाल यांनी वजन कमी केले. या चित्रपटात मोहनलाल जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स करताना दिसणार आहेत. अर्थात वजन कमी करण्यासाठी केवळ हा एकच सिनेमा कारणीभूत नसून यामागे त्यांचा आणखी एक आगामी सिनेमाही कारणीभूत आहे. होय, अलीकडे मोहनलाल यांनी ‘रंदमूजन’ अर्थात ‘महाभारत’ या बिग बजेट सिनेमाची घोषणा केली आहे. मोहनलाल यांचे हे टॉन्सफॉर्मेशन यासाठीही आहे.

Web Title: OMG! Superstar Mohanlal was also known hard!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.