OMG!! हॉलिवूड स्टार अल पचिनो धनुषसोबत करणार तामिळ डेब्यू?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2016 12:51 PM2016-10-24T12:51:55+5:302016-10-24T12:51:55+5:30

आज सोमवारचा दिवस एका मोठ्या बातमीसह उजाळला. होय, ही बातमी म्हणजे, तामिळ व बॉलिवूड अभिनेता धनुष हा कार्तिक सुब्बाराज ...

OMG !! Tamil debut with Hollywood star Al Pacino Dhanush? | OMG!! हॉलिवूड स्टार अल पचिनो धनुषसोबत करणार तामिळ डेब्यू?

OMG!! हॉलिवूड स्टार अल पचिनो धनुषसोबत करणार तामिळ डेब्यू?

googlenewsNext
सोमवारचा दिवस एका मोठ्या बातमीसह उजाळला. होय, ही बातमी म्हणजे, तामिळ व बॉलिवूड अभिनेता धनुष हा कार्तिक सुब्बाराज यांच्या नव्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार ती. थांबा...थांबा...! ही बातमी इथेच संपत नाही. खरी बातमी पुढे आहे. ताज्या बातमीनुसार, मेकर्सने या चित्रपटासाठी हॉलिवूड स्टार अल पचिनो याच्याशी संपर्क साधला आहे. होय, विश्वास बसत नाहीय ना? सध्या अल पचिनो यांच्याशी मेकर्सची चर्चा सुरु आहे. ही चर्चा फळास आली तर धनुष आणि अल पचिनो एकत्र काम करताना दिसतील. याही पेक्षा मोठी गोष्ट म्हणजे, हॉलिवूड स्टार अल पचिनो तामिळ डेब्यू करतील.
सुब्बाराज यांच्या या आगामी चित्रपटाचा अर्धा अधिक भाग अमेरिकेत शूट होणार आहे. त्यामुळे अल पचिनो यांच्यासाठी ते सोयीस्कर ठरेल. इ.स.१९७१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द पॅनिक इन नीडल पार्क’ या चित्रपटात पचिनोने  हेरॉईनचे व्यसन असलेल्या माणसाची भूमिका साकारली होती. पचिनोने साकारलेली ही व्यक्तिरेखा पाहून दिग्दर्शक फ्रान्सिस फोर्ड कपोलाचे लक्ष त्याच्याकडे गेले.कपोलाच्या ‘द गॉडफादर’ या इ.स. १९७२ साली प्रसिद्ध झालेल्या चित्रपटातील मायकल कार्लिओनच्या भूमिकेनंतर पचिनो जगप्रसिद्ध झाला. कपोलाने त्यामानाने नवख्या असलेल्या पचिनोला मायकल कार्लिओनचे काम करण्याची संधी देऊन अनेकांची नाराजी ओढवली होती. पचिनोला या चित्रपटातील त्याच्या अभिनयाबद्दल अकॅडेमी पुरस्कारांमध्ये  सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता  गटात नामांकन मिळाले. इ.स.१९७३ मध्ये पचिनोने अतिशय यशस्वी सर्पिको मध्ये आणि तुलनेने कमी यशस्वी स्केअरक्रो मध्ये जीन हॅकमन सोबत काम केले.

Web Title: OMG !! Tamil debut with Hollywood star Al Pacino Dhanush?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.