OMG: ‘डीडीएलजे’च्या दृष्याचे ‘हे’ आहेत कॉपीबहाद्दर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2017 01:25 PM2017-02-09T13:25:08+5:302017-02-09T18:55:08+5:30
बºयाचवेळा एखादे दृश्य गाजले की, त्याची कॉपी करण्याची बॉलिवूडमध्ये परंपरा आहे. ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाऐंगे’ या चित्रपटातील रेल्वे स्थानकावरील ...
ब याचवेळा एखादे दृश्य गाजले की, त्याची कॉपी करण्याची बॉलिवूडमध्ये परंपरा आहे. ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाऐंगे’ या चित्रपटातील रेल्वे स्थानकावरील काजोल-शाहरुखचे दृश्य खूप गाजले. याचप्रमाणे अनेक चित्रपटात अशी दृश्ये चित्रित करण्यात आली. रणवीरसिंगने एका चित्रपटात असेच दृश्य साकारले आहे. या संदर्भात त्याने ट्विटरवर मेसेज लिहून कृपया असे प्रकार करू नयेत, अशी विनंतीही केली आहे. ‘डीडीएलजे’ चित्रपटातील हे दृश्य आणखी कोणत्या चित्रपटात साकारण्यात आले आहे, ते पाहूयात...
दिलवाले दुल्हनियाँ ले जाऐंगे
‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाऐंगे’ या चित्रपटातील शेवटच्या दृश्यात राज (शाहरुख खान) रेल्वेने जात असताना सिमरन (काजोल) वडिलांचा हात सोडून त्याच्या मागे धावते. त्यावेळी हात पुढे करून शाहरुख तिला ओढण्याचा प्रयत्न करतो. हा सीन गेली अनेक वर्षे चित्रपट रसिकांच्या मनात कोरला गेला आहे.
चेन्नई एक्स्प्रेस
शाहरुख खानला अशी दृश्ये करणे कदाचित आवडत असावे. चेन्नई एक्स्प्रेसमध्ये त्याच्यासोबत दीपिका पादुकोण आहे. या चित्रपटात राहुल (शाहरुख खान) हा मीना (दीपिका पादुकोण) हिला रेल्वे डब्यात खेचण्याचा प्रयत्न करीत असतो. चित्रपटाच्या अगदी सुरुवातीलाच हे दृश्य दाखविण्यात आले आहे. ‘डीडीएलजे’प्रमाणेच हे दृश्य आहे.
हाफ गर्लफ्रेंड
चेतन भगतच्या ‘हाफ गर्लफ्रेंड’ या पुस्तकावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सुरी याने केले आहे. रिया (श्रद्धा कपूर) आणि माधव (अर्जुन कपूर) यांच्यात असेच एक दृश्य आहे. रेल्वे सुरू झालेली असताना रिया ही दरवाजाजवळ उभी असते. त्यावेळी धावतच माधव तिच्यासोबत येण्याचा प्रयत्न करीत असतो.
जब वुई मेट
इम्तियाज अली दिग्दर्शित ‘जब वुई मेट’ या चित्रपटात अशाच प्रकारचे दृश्य दाखविण्यात आले आहे. आदित्य (शाहिद कपूर) आणि गीत (करिना कपूर) हे दोघे पुन्हा एकत्र येतात, अशा आशयाचे हे दृश्य आहे. शाहिद हा रेल्वेच्या दरवाजात उभा राहून करिनाचा हात हातात घेताना दिसून येतो.
ये जवानी है दिवानी
रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण यांनी ये जवानी है दिवानी या चित्रपटात हे दृष्य साकारले आहे. रणबीर हा रेल्वेच्या दरवाजामध्ये उभा राहून दीपिकाला आत खेचतो अशा प्रकारचे हे दृष्य आहे.