बाबो ! आलिशान गाडीने नाही तर थेट हेलिकॉप्टरमधून शूटिंगला येतो हा सुपरस्टार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 06:03 PM2023-02-03T18:03:17+5:302023-02-03T18:03:34+5:30

हा सुपरस्टार फक्त प्रसिद्धीच्या बाबतीतच नाही तर संपत्तीच्या बाबतीतही जगभरातील बड्या स्टार्सना टक्कर देत आहे.

OMG! This superstar does not come in a luxury car but directly from a helicopter to shoot | बाबो ! आलिशान गाडीने नाही तर थेट हेलिकॉप्टरमधून शूटिंगला येतो हा सुपरस्टार

बाबो ! आलिशान गाडीने नाही तर थेट हेलिकॉप्टरमधून शूटिंगला येतो हा सुपरस्टार

googlenewsNext

सुपरस्टार कमल हासन (Kamal Haasan) त्यांच्या दमदार अभिनयासाठी तसेच लक्झरी जीवनशैलीसाठी ओळखले जातात. कमल हासन यांच्या विक्रम या चित्रपटाने ३०० कोटींपेक्षा जास्त कमाई करुन मोठा विक्रम केला होता. सध्या ते इंडियन २ चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. मात्र या चित्रपटाच्या शूटिंगसाठी ते कोणत्या आलिशान कारने नाही तर हेलिकॉप्टरने येत आहेत. इतकंच नाही तर ते एक दिवस नाही तर दररोज हेलिकॉप्टरने प्रवास करत आहेत. 

'विक्रम'च्या अफाट यशानंतर कमल हासन 'इंडियन २'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. रिपोर्ट्सनुसार, अभिनेते चित्रपटाच्या शूटिंगसाठी हेलिकॉप्टरचा वापर करत आहेत. कमल हासन यांनी नुकताच त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ते हेलिपॅडवर हेलिकॉप्टरसमोर उभे आहेत. कमल हसन यांनी फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'माझ्या लोकेशनचा अंदाज लावणे खूप सोपे आहे.' कमल हासन यांचा हा अंदाज पाहून सर्वजण चकित झाले आहेत. या चित्रपटासाठी कमल हसन यांनी १५० कोटी रुपये घेतले असल्याचे बोलले जात आहे.

रिपोर्ट्सनुसार, कमल हसनची एकूण संपत्ती ७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. सुपरस्टारचा चेन्नईमध्ये एक आलिशान बंगला आहे ज्याची किंमत सुमारे ३० कोटी आहे. चेन्नईतील घराशिवाय कमल हसन यांची विदेशातही अनेक मालमत्ता आहेत. त्यांच्याकडे अनेक आलिशान गाड्यांचे कलेक्शन आहे, ज्यात हमर, ऑडी, लिमोझिन यांसारख्या अनेक गाड्यांचा समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार, कमल हासन एका खाजगी हेलिकॉप्टरचेही मालक आहेत.

Web Title: OMG! This superstar does not come in a luxury car but directly from a helicopter to shoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.