OMG ! ​‘या’ मराठी चित्रपटाची कॉपी आहे वरूण धवनचा ‘अक्टूबर’; मूळ दिग्दर्शिकेला हवा न्याय!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 07:25 AM2018-04-20T07:25:59+5:302018-04-20T12:55:59+5:30

वरूण धवन आणि बनिता संधू स्टारर ‘अक्टूबर’ रिलीज होऊन आठवडा झाला. चित्रपट बॉक्सआॅफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. पण ...

OMG! Varun Dhawan's 'October' is a copy of 'This Marathi Movie'; Basic director of air navigation !! | OMG ! ​‘या’ मराठी चित्रपटाची कॉपी आहे वरूण धवनचा ‘अक्टूबर’; मूळ दिग्दर्शिकेला हवा न्याय!!

OMG ! ​‘या’ मराठी चित्रपटाची कॉपी आहे वरूण धवनचा ‘अक्टूबर’; मूळ दिग्दर्शिकेला हवा न्याय!!

googlenewsNext
ूण धवन आणि बनिता संधू स्टारर ‘अक्टूबर’ रिलीज होऊन आठवडा झाला. चित्रपट बॉक्सआॅफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. पण या चित्रपटाबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. होय, शूजीत सरकार दिग्दर्शित ‘अक्टूबर’  हा हिंदी चित्रपट एका मराठी चित्रपटाची हुबेहुब कॉपी असल्याचा दावा केला जात आहे. गतवर्षी १८ आॅगस्टला ‘आरती : द अननोन लव्ह स्टोरी’ नामक मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. ‘अक्टूबर’  हा याच मराठी चित्रपटाची कॉपी असल्याचा दावा हेमल त्रिवेदी नामक  फिल्ममेकर, प्रोड्यूसर व एडिटरने केला आहे. फेसबुकवर एक खळबळजनक पोस्ट लिहित हेमलने शूजीत सरकार यांच्यावर मराठी चित्रपट चोरल्याचा आरोप केला आहे.
 ‘शूजीत सरकार यांनी सारिका मेने यांचा मराठी चित्रपट ‘आरती : द अननोन लव्ह स्टोरी’ची चोरी केली आहे. सारिकाचा हा चित्रपट तिचा भाऊ सनीच्या खºया आयुष्यावर आधारित आहे. शूजीत सरकार यांनी चित्रपटाची कथाचं नाही तर त्यातील ओरिजनल सीन्स आणि लूकची तंतोतंत कॉपी केली. त्यांनी ना मराठी चित्रपटाचे हक्क मागितले ना. मूळ मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शिका सारिका यांच्याशी संपर्क साधण्याची तसदी घेतली,’असे हेमल त्रिवेदीनेआपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.



ALSO READ : ‘१०० करोडी स्टार’ वरूण धवन ठरला ‘फ्लॉप’! ‘अक्टूबर’ने केली निराशा!!

‘शूजीत सरकार यांच्या या कृत्यामुळे सारिका तणावात आहे. इतकी की, ती सुसाइडल केस झाली आहे. गेल्या काही दिवसांत तिने देशाच्या अनेक संस्थांकडे गेली, अनेक लोकांकडे गेली. पण कुणीच तिची मदत केली नाही. न्याय मिळवण्यासाठी आत्तापर्यंत तिने २ लाखांवर खर्च केलेत. सारिका एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. ‘आरती : द अननोन लव्ह स्टोरी’ हा चित्रपट साकारण्यासाठी तिने आपले वडिलोपार्जित घरही विकले. ‘आरती : द अननोन लव्ह स्टोरी’ची मूळ कथा, दृश्ये सगळे काही चोरले गेले. पण याविरोधात कायदेशीर कारवाईचा खर्च पेलण्यास सारिका असमर्थ आहे. मी स्वत: ‘आरती : द अननोन लव्ह स्टोरी’चा हिंदी रिमेक बनवणार होते. यासाठी मी ‘आरती : द अननोन लव्ह स्टोरी’चे ४० टक्के हक्क विकत घेतले होते. सॉन्ग आणि स्क्रीनप्ले लिहिण्यावरही बराच खर्च केला होता. पण आमचा हिंदी रिमेक बनण्यापूर्वीच ‘अक्टूबर’ रिलीज झाला. आम्हाला न्याय हवाय. मी या लढाईत सारिकाच्या पाठीशी आहे, असेही तिने लिहिले आहे.

Web Title: OMG! Varun Dhawan's 'October' is a copy of 'This Marathi Movie'; Basic director of air navigation !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.