It's Magical..! नोरा फतेहीचं हे मादक फोटोशूट पाहून तुम्हीही व्हाल फिदा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 11:52 AM2021-09-30T11:52:41+5:302021-09-30T11:53:51+5:30
होय, एका फॅशन फिल्मच्या निमित्तानं नोरा अगदी अप्सरेसारखी सजली आणि सगळ्यांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या....
बॉलिवूडची डान्सिंग क्वीन नोरा फतेही (Nora Fatehi) तिच्या ग्लॅमरस व बोल्ड लुकमुळे सतत चर्चेत असते. बड्या बड्या डिझाइनर्सनी तयार केलेले आऊटफिट घालून अगदी लिलया मिरवते. तिचा शानदार फॅशन सेन्स अनेकांना मोहात पाडतो. सध्या ती डान्समुळे नाही तर तिच्या अशाच आऊटफिटमुळे चर्चेत आहे. होय, एका फॅशन फिल्मच्या निमित्तानं नोरा अगदी अप्सरेसारखी सजली आणि सगळ्यांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या. अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाईन केलेल्या डीप नेक थाय स्लिट गाऊनमध्ये नोरा इतकी सुंदर दिसत होती की, तिच्यावरून नजर हटेना.
बॉलिवूडचे दिग्गज फॅशन डिझाईनर अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या फॅशन फिल्मसाठी नोरानं नुकतंच शूटींग केलं. तिच्या या ग्लॅमरस शूटचेएक ना अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि या लुकमुळे इंटरनेटवर अक्षरश: धुरळा उडाला आहे.
डिप नेकची आयव्हरी शेडची ब्रालेट चोळी आणि सोबत इंट्रीकेट एम्ब्रॉयडरी वर्क असलेला चमकदार लहंगा शिवाय डोक्यावर मोठा हेडपीस अशा स्टायलिश लुकमध्ये नोरा दिसली. तिचा हा रॉयल लुक पाहून अनेकजण तिच्या प्रेमात पडलेत. गळ्यात विंटेज स्टाईलचे खड्यांचे चोकर नेकलेस, मॅचिंग स्टड्स ईअररिंग्य, साईड पार्टेड हेअरस्टाईल अशा तिच्या लुकवर चाहते फिदा झालेत.
नोराने छोट्या पडद्यापासून आपल्या करिअरची सुरूवात केली. ‘बिग बॉस 9’मध्ये एक स्पर्धक म्हणून ती सहभागी झाली. यानंतर मात्र तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.
2014 मध्ये तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिला तेलुगू चित्रपटांच्या आॅफर्स येऊ लागल्या. तुम्हाला कदाचित माहित नसेल की, नोरा फक्त नृत्यातच नाही तर मार्शल आर्ट्स मध्येही पारंगत आहे. सत्यमेव जयते, स्ट्रीट डान्सर 3 डी, भारत, भुज-द प्राईड आॅफ इंडिया अशा सिनेमात तिने काम केले आहे.