Once Upon a Time : गोविंदा ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात झाला होता वेडा; मात्र आईचा होता अडथळा!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2017 04:11 PM2017-06-15T16:11:48+5:302017-06-15T21:50:09+5:30
८० च्या दशकात पडद्यावर धूम उडवून देणाºया अभिनेता गोविंदा आणि नीलम या जोडीने त्याकाळी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. अनेक ...
८ च्या दशकात पडद्यावर धूम उडवून देणाºया अभिनेता गोविंदा आणि नीलम या जोडीने त्याकाळी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. अनेक चित्रपटांमध्ये झळकलेल्या या जोडीने अनेक हिट चित्रपट दिले. याचदरम्यान या दोघांमध्ये प्रेमांकुरही फुलले होते. तसेच जन्मभर एकमेकांसोबत राहण्याचे त्यांनी एकमेकांना वचनही दिले होते. परंतु या लव्हबर्डच्या प्रेमात गोविंदा यांची आई अडथळा ठरल्याने, गोविंदाला नीलमशी लग्न करता आले नाही.
पिंकविला या एंटरटेनमेंट पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या एका आर्टिकलनुसार, गोविंदा नीलमबरोबर लग्न करण्यास उत्सुक होता; मात्र गोविंदाची आई त्यांच्या लग्नाच्या विरोधात होती. कारण गोविंदाने दिग्दर्शक आनंद सिंग यांची मेहुणी सुनीता (गोविंदाची पत्नी) हिच्याबरोबर लग्न करावे, अशी त्याच्या आईची इच्छा होती. गोविंदा आईच्या शब्दाबाहेर कधीच गेला नसल्याने त्याने सुनीताबरोबर लग्न करण्यास होकार दिला.
गोविंदाने आईच्या इच्छेनुसार सुनीता हिच्याबरोबर मार्च १९८७ मध्ये विवाह केला; मात्र त्याने लग्न केल्याची कुठेही वाच्यता केली नव्हती. कारण त्याला असे वाटत होते की, जर ही बातमी इंडस्ट्रीत पसरल्यास त्याचा परिणाम माझ्या करिअरवर होईल. विशेष म्हणजे ही बाब गोविंदाची मुलगी टीना हिच्या जन्मापर्यंत लपवून ठेवण्यात आली होती. १९९० मध्ये जेव्हा गोविंदाने एका साप्ताहिकाला मुलाखत दिली होती तेव्हा त्याने लग्नानंतरही मी नीलमला विसरू शकलो नाही, अशी कबुली दिली होती.
अशी झाली होती गोविंदा-नीलमची पहिली भेट
प्राणलाल मेहता यांच्या कार्यालयात गोविंदाने नीलमला पहिल्यांदा बघितले होते. गोविंदाने मुलाखतीत म्हटले होते की, जेव्हा मी पहिल्यांदा नीलमला बघितले होते तेव्हा तिने पांढºया रंगाचे शॉर्ट्स घातले होते. तिचे मोकळे लांब केस बघून असे वाटत होते की, जणू काही एखादी परीच भूतलावर अवतरली आहे. नीलमने मला बघून जसे हॅलो म्हटले तेव्हा तिला उत्तर देताना मी चांगलाच घाबरलो होतो. कारण त्यावेळी माझी इंग्रजी फारशी चांगली नव्हती. त्यावेळी मी विचार करीत होतो की, सेटवर मी नीलमशी कम्युनिकेट कसे करावे? मात्र हळूहळू आमच्यात मैत्री झाली. मी सेटवर तिला जोक्स सांगून खूप हसवित होतो. पुढे आम्ही एकमेकांना भेटू लागलो. हळूहळू आम्ही एकमेकांना पसंतही करू लागलो. तिच्याविषयी माझे आकर्षण खूपच वाढले होते. कारण ती अशी लेडी होती, जिच्यावर प्रेम करण्यावाचून कोणीही राहू शकणार नव्हते. त्यामुळे मीदेखील तिच्या प्रेमात पडलो होतो.
सुनीताबरोबर रिलेशनशिप
गोविंदा सुनीताबरोबर कधीच सीरियस रिलेशनशिप ठेऊ इच्छित नव्हता. त्यामुळे तो त्याच्या चित्रपटात अधिककाळ व्यस्त राहणे पसंत करीत होता. याचदरम्यान एक दिवस त्याचा मोठा भाऊ कीर्ती सेटवर आला होता. त्यावेळी गोविंदा एक रोमॅण्टिक सीन शूट करीत होता; मात्र गोविंदा हा सीन करताना थोडासा अनकम्फर्ट होता. त्यावेळी कीर्तीने गोविंदाला म्हटले की, रोमान्सचा एक्सपीरियन्स मिळविण्यासाठी तुला कोणासोबत तरी अफेअर करावे लागेल. तेव्हाच तुला समजेल की, मुलीला मिठीत कसे घ्यावे. भावाचा सल्ला ध्यानात ठेवून गोविंदाने सुनीताबरोबर जवळीकता वाढविली. हळूहळू तो सुनीताकडे आकर्षित झाला. पुढे सुनीताशी जवळीकता वाढविली.
सुनीताबरोबर तोडली रिलेशनशिप
सुनीताबरोबर रिलेशनशिपमध्ये असतानाही गोविंदा नीलमप्रती खूपच पझेसिव्ह होता. जेव्हा गोविंदा त्याच्या चित्रपटांमध्ये बिझी असायचा तेव्हा सुनीताच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत होती. त्यामुळे लहान-सहान गोष्टींवरून दोघांमध्ये वाद होत होते. एकदा सुनीता नीलमविषयी अशी काही बोलली ज्यामुळे गोविंदाचा संयम सुटला होता. त्याने तडकाफडकी सुनीताबरोबरचे सर्व नाते तोडण्याचा निर्णय घेतला. एवढेच नव्हे तर त्याने सुनीताबरोबरच साखरपुडाही मोडला होता. तब्बल पाच दिवस दोघांमध्ये कुठलीही चर्चा झाली नव्हती. गोविंदाने तर हा नीलमशी लग्न करण्याचा निश्चयही केला होता. कारण त्याला असे वाटत होते की, नीलम त्याची एक चांगली लाइफ पार्टनर बनू शकेल.
गोविंदाने नीलमपासून लग्नाची गोष्ट लपविली
गोविंदा आईची (निर्मला देवी) कुठलीच गोष्ट टाळत नसे. जेव्हा त्याच्या आईने सुनीताबरोबर लग्न करण्याचे गोविंदाला सांगितले तेव्हा त्याने यास लगेचच होकार दिला. पुढे मार्च १९८७ मध्ये गोविंदाने सुनीताबरोबर विवाह केला; मात्र अशातही त्याच्या मनातून नीलमविषयीचे प्रेम कमी झाले नव्हते. त्याने सुनीताबरोबर विवाह केल्याची गोष्ट नीलमपासून लपवून ठेवली होती. पुढे त्याला याचा पश्चातापही झाला होता. त्याला असे वाटत होते की, सुनीताबरोबरच्या लग्नाची गोष्ट नीलमपासून लपवून ठेवण्यात काहीच अर्थ नव्हता.
एकतर्फी प्रेम
गोविंदा नीलमवर जिवापाड प्रेम करीत होता; मात्र नीलमकडून असे काहीच नव्हते. वास्तविक गोविंदानेच नीलमकडे कधीच त्याच्या प्रेमाची कबुली दिली नव्हती. खरं तर नीलमही गोविंदावर प्रेम करीत होती. ती त्याला परफेक्ट लाइफ पार्टनर समजत होती. परंतु त्याच्याकडून कधीच प्रस्ताव आला नसल्याने ती त्याच्याविषयी फारशी गंभीर नव्हती. त्यातच गोविंदा, जुही चावला आणि दिव्या भारती यांच्याकडेही आकर्षित झाल्याने, नीलमने त्याच्यापासून दुरावा निर्माण केला होता. त्यामुळे गोविंदाचे तिच्यावरील प्रेम एकतर्फी ठरले.