आई झाल्यानंतर दीड वर्षांनी सोनमनं घटवलं तब्बल २० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते थक्क
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 03:17 PM2024-01-18T15:17:41+5:302024-01-18T15:18:12+5:30
Sonam Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर हिने २०१८ मध्ये लग्न केले आणि २०२२ मध्ये मुलगा वायुला जन्म दिला. गरोदरपणात जसं सर्व महिलांसोबत घडतं, तसंच सोनमसोबतही झालं. आई होण्यासोबतच सोनमचे वजनही खूप वाढले आणि आता तब्बल दीड वर्षानंतर तिने प्रेग्नेंसीनंतर वजन घटवले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) हिने २०१८ मध्ये लग्न केले आणि २०२२ मध्ये मुलगा वायुला जन्म दिला. गरोदरपणात जसं सर्व महिलांसोबत घडतं, तसंच सोनमसोबतही झालं. आई होण्यासोबतच सोनमचे वजनही खूप वाढले आणि आता तब्बल दीड वर्षानंतर तिने प्रेग्नेंसीनंतर वजन घटवले आहे. सोनम कपूरने वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतली असून अभिनेत्रीने तिच्या प्रवासाविषयीही पोस्ट केले आहे.
सध्या सोनम चित्रपटांपासून दूर आहे आणि आपल्या मुलगा वायुच्या संगोपनात व्यस्त आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये आई झालेली सोनम आता स्वतःच्या कामात व्यस्त आहे. खूप घाम गाळल्यामुळे सोनमला गरोदरपणात वाढलेले वजन नियंत्रित करण्यात यश आले आहे. सोनमने तिच्या वर्कआउट क्षणाची झलक इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे, ज्यामध्ये ती जिम वेअरमध्ये दिसत आहे.
सोनम कपूरला आणखी ६ किलो वजन कमी करायचंय
या व्हिडीओ क्लिपमध्ये सोनम तिच्या कॅमेऱ्याने स्वत:ला शूट करताना दिसत आहे. यासोबतच तिने कॅप्शनमध्ये सांगितले की, अभिनेत्रीने तिचे २० किलो वजन कमी केले आहे. एवढेच नाही तर या पोस्टमध्ये त्याने आपले टार्गेटही नमूद केले आहे. सोनमने सांगितले की, तिला अजून जास्त मेहनत करावी लागेल आणि ६ किलो वजन कमी करावे लागेल.
१६ महिने व्यायामासोबत डाएटचीही घेतली काळजी
अलीकडेच सोनमने तिच्या एका पोस्टमध्ये सांगितले होते की तिने १६ महिने डाएट आणि वर्कआउटची काळजी कशी घेतली आणि आता तिचे शरीर पुन्हा पूर्वीसारखे आकारात आले आहे. तथापि, तिने सांगितले होते की यासाठी तिने कधीही क्रॅश डाएट किंवा अति वर्कआउटचा अवलंब केला नाही परंतु स्वत:ची आणि मुलाची काळजी घेत त्यावर नियंत्रण ठेवले आहे. तिला वजन कमी करणे कोणत्या चॅलेंजपेक्षा कमी नव्हते. कारण तिला टाइप १चा डायबिटीस आहे. त्यामुळे तिने डाएटमध्ये बदाम, दुध, फ्रुट्स, अॅवाकोडो, हिरव्या भाज्यांचा समावेश केला. ती वेळेनुसार सगळं बॅलन्स करते.