सनी देओलच्या 'जाट' सिनेमाच्या टीझरमध्ये दिसला वन-मॅन आर्मी लूक; पाहा हा टीझर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 15:15 IST2024-12-10T15:14:07+5:302024-12-10T15:15:54+5:30
अभिनेता सनी देओल(Sunny Deol)च्या आगामी अॅक्शन सिनेमा 'जाट'(Jaat Movie)चा बहुप्रतिक्षित टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

सनी देओलच्या 'जाट' सिनेमाच्या टीझरमध्ये दिसला वन-मॅन आर्मी लूक; पाहा हा टीझर
अभिनेता सनी देओल(Sunny Deol)च्या आगामी अॅक्शन सिनेमा 'जाट'(Jaat Movie)चा बहुप्रतिक्षित टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे, ज्याने चाहत्यांना अक्षरशः थक्क करून टाकले आहे. या सिनेमाच्या निमित्ताने अॅक्शन सुपरस्टार परत आला आहे असं नक्कीच म्हणावं लागेल. काही दिवसांपूर्वी ब्लॉकबस्टर पुष्पा २च्या विशेष प्रीमियर दरम्यान जाटचा टीझर प्रदर्शित झाला. १२,५०० स्क्रीनवर हा टीझर दाखवण्यात आला आणि ही भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात मोठी बाब आहे.
जेव्हा या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला तेव्हा या प्रेक्षकांची एनर्जी अफलातून होती. सनी देओलच्या दमदार अभिनयाने आणि थरारक अॅक्शन सीन्सला प्रेक्षकांनी जोरदार शिट्ट्या आणि टाळ्यांच्या माध्यमातून त्यांचा उत्साह आणि प्रतिसाद दाखवला. टीझरने चाहत्यांना खुर्चीला खिळवून ठेवले, यावरुन हे पुन्हा सिद्ध झाले की सनी देओल भारतीय सिनेसृष्टीतील खरा अॅक्शन हिरो आहे.
'जाट'मध्ये दिसणार हे कलाकार
गोपीचंद मालिनेनी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला आणि मायथ्री मूवी मेकर्स व पीपल मीडिया फॅक्टरी या दोन दमदार निर्मात्यांनी निर्मिती केलेला 'जाट' हा सिनेमा अॅक्शन जॉनरला एका नव्या उंचीवर घेऊन जाणार हे नक्की. रणदीप हुड्डा, विनीत कुमार सिंह, सैयामी खेर आणि रेजिना कैसंड्रा यांसारख्या प्रतिभावान कलाकारांच्या जबरदस्त अभिनयासोबतच हा सिनेमा प्रेक्षकांना एका दमदार आणि रोमांचक कथानकाचा अनुभव देणार आहे.
'जाट' या सिनेमाची संगीताची जबाबदारी थमन एस यांनी घेतली आहे, तर सिनेमॅटोग्राफी ऋषी पंजाबी यांनी सांभाळली आहे. नवीन नूली यांनी एडिटींगचे काम अतिशय चोख केले असून, अविनाश कोला यांनी प्रोडक्शन डिझाइनची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. हा चित्रपट एप्रिल २०२५ मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.