Katrina Kaif and Vicky Kaushal: कतरिनावर एकतर्फी प्रेम, तिचा पत्नी म्हणून उल्लेख, जीवे मारण्याची धमकी देणारा अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 03:06 PM2022-07-25T15:06:31+5:302022-07-25T16:06:14+5:30

Katrina Kaif and Vicky Kaushal: बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, या प्रकरणी तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवून आरोपीला अटक केली आहे.

One-sided love for Katrina Kaif, referred to as his wife, death threats arrested | Katrina Kaif and Vicky Kaushal: कतरिनावर एकतर्फी प्रेम, तिचा पत्नी म्हणून उल्लेख, जीवे मारण्याची धमकी देणारा अटकेत

Katrina Kaif and Vicky Kaushal: कतरिनावर एकतर्फी प्रेम, तिचा पत्नी म्हणून उल्लेख, जीवे मारण्याची धमकी देणारा अटकेत

googlenewsNext

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, या प्रकरणी तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवून आरोपीला अटक केली आहे. मनविंदर सिंह असे अटक आरोपीचे नाव आहे. दरम्यान, त्याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी मनविंदर हा अभिनेता आहे. तो कतरिनाचा फॅन आहे. तसेच तिच्याशी विवाह करण्याची त्याची इच्छा होती. एवढंच नाही तर तो तिला पत्नीही मानायचा. 

आरोपी मनविंदर हा मुंबईत राहतो. तसेच इन्स्टाग्रामवर त्याने कतरिना कैफचा उल्लेख आपली पत्नी असा केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आरोपी हा कतरिना कैफ हिला सोशल मीडियावर स्टॉक करत होता. अखेर कतरिनाने वैतागून याबाबतची माहिती पती विकी कौशल याला दिली. तेव्हा विकीने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने विकीलाच जीवे मारण्याची धमकी दिली. 

जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात भादंवि कलम ५०६-II आणि ३५४-डी अन्वये गुन्हा दाखल केला. हा गुन्हा अज्ञात व्यक्तीविरोधात दाखल करण्यात आला होता. मात्र पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचायला वेळ लागला नाही. अखेर पोलिसांनी आरोपी मनविंदर याच्या मुसक्या आवळल्या.

आरोपीचं इन्स्टाग्राम अकाऊंट तपासल्यावर पोलिसांनाही धक्का बसला आहे. या व्यक्तीने इन्स्टाग्रावर आपलं नाव King Aditya Rajput in VVIP असं लिहिलं आहे. तसेच त्याने प्रोफाइल बायोमध्ये स्वत:चा उल्लेख अभिनेता असा केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने त्याच्या बायोमध्ये My Girlfriend/Wife @katrinakaif असं लिहिलं आहे. तसेच ते कतरिनाच्या अधिकृत अकाऊंटला टॅगही केलेलं आहे.  

Web Title: One-sided love for Katrina Kaif, referred to as his wife, death threats arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.