'फक्त त्याच्यामुळेच मला...', सुशांत सिंग राजपूतच्या आठवणीत भावुक झाली सारा अली खान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 02:01 PM2024-06-22T14:01:27+5:302024-06-22T14:02:11+5:30
Sara Ali Khan And Sushant Singh Rajput : 'केदारनाथ' चित्रपटातून सारा अली खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटातून तिने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. या सिनेमात तिच्यासोबत दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत मुख्य भूमिकेत पाहायला मिळाला.
'केदारनाथ' (Kedarnath Movie) चित्रपटातून सारा अली खान(Sara Ali Khan)ने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटातून तिने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. या सिनेमात तिच्यासोबत दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) मुख्य भूमिकेत पाहायला मिळाला. यातील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली. दरम्यान आता या चित्रपटाचा किस्सा सांगताना सुशांतच्या आठवणीत अभिनेत्री भावुक झाली.
अलिकडेच सारा अली खानने एका मुलाखतीत केदारनाथ चित्रपटासंदर्भात किस्सा सांगितला. तसेच त्यावेळी तिने असेही म्हटले की, सुशांतसोबत एकच आठवण नाही. त्याच्यासोबतच्या कोणत्या एका क्षणाबद्दल सांगणं खूप कठीण आहे. मिड डेला दिलेल्या मुलाखतीत सुशांतची आठवण सांगताना सारा अली खान खूप इमोशनल झाली होती.
... आणि सुशांतने केली मदत
सारा अली खानने केदारनाथ चित्रपटाच्या सेटवरील एका सुंदर आठवणीचा उल्लेख केला. याबद्दल बोलताना तिचे डोळे पाणावले होते. सारा म्हणाली की, एक क्षण असा आला जेव्हा गट्टू सर (दिग्दर्शक अभिषेक कपूर) मला काहीतरी म्हणाले आणि निघून गेले आणि मला समजले नाही. नंतर सुशांतने ती ओळ बोलून मला मदत केली. मी चित्रपटात सुशांतच्या ओळी कॉपी केल्या होत्या.
पहिल्या चित्रपटासाठी प्रेम मिळाले ते केवळ सुशांतमुळे
आपला मुद्दा मांडताना अभिनेत्री म्हणाली की, पूर्वी मला इतके चांगले हिंदी बोलता येत नव्हते. आज माझ्या चाहत्यांनी माझ्या कामाचे कौतुक केले तर ते सुशांतमुळेच आहे. 'केदारनाथ'मध्ये काम केल्यानंतर मला जे प्रेम मिळाले ते सुशांतमुळेच आहे. त्याच्यामुळेच मला एवढी पसंती मिळाली. त्याच्याशी संबंधित अनेक आठवणी आहेत त्यातील एखादी मी तुम्हाला सांगू शकत नाही.
सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खान या दोघांनी केदारनाथमध्ये खूप छान काम केले होते. यातील त्या दोघांची केमिस्ट्रीदेखील चाहत्यांना खूप भावली होती. मात्र १४ जून, २०२० साली सुशांतने जगाचा कायमचा निरोप घेतला. आजही त्याच्यासोबत काम केलेले कलाकार त्याला विसरलेले नाहीत.