ऋषी कपूर यांच्या निधनावेळी थेट स्मशाभूमीत पोहचले होते बॉलिवूड कलाकार आणि सुशांतसाठी काही चेहरे सोडले तर बाकी कलाकार फिरकलेच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 12:30 PM2020-06-16T12:30:14+5:302020-06-16T12:35:48+5:30
कंगाना रणौतनं सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येसाठी नेपोटिझम आणि बॉलिवूडकरांना जबाबदार धरलं आहे
सुशांतच्या निधनानंतर अनेक बडे बडे कलाकार आज वेगवेगळी मतं मांडताना दिसतायेत. त्याच्या खाजगी आयुष्यापासून ते व्यावसायिक आयुष्यापर्यंत बड्या बड्या बाता मारताना दिसतायेत.
सुशांतला ते किती ओळखत होते यावर भली मोठी पोस्ट शेअर करत भावूक होताना दिसतायेत. कलाकारांच्या पोस्ट पाहून तर त्याच्या कुटुंबापेक्षा हेच लोक त्याला जास्त ओळखत होते की काय? असेच वाटते.
काही प्रसिद्ध चेहरे सोडले तर कोणीही त्याच्यासाठी त्याच्या घरी किंवा स्मशानभूमीत पोहचले नाही. घरीच बसून श्रद्धांजली वाहत होते. पण ऋषी कपूर यांचे निधन झाले तेव्हा मात्र कुटुंबाच्या सांत्वनासाठी अख्खं बॉलिवूड पोहचले होते. तेव्हाही कोरोना व्हायरसचा प्रभाव होताच ना? हीच परिस्थीती इरफान खानच्या निधनावेळीही पाहायला मिळाली होते. इरफान खानवेळीही अनेक नावाजलेल्या कलाकारांनी पाठ फिरवली होती.
Mad respect for Shraddha Kapoor and Kriti Sanon for showing up at Sushant’s funeral. You may not like them as actors but as human beings they’re gold. Did no show off on twitter but were there with him in his final journey. Lord please protect them🥺❤️
— Queerantine🌈 (@piggy_chopps) June 15, 2020
चेहरे बघूनच एक कालाकार दुस-या कलाकारसह मैत्री ठेवतो. वेळ पडल्यावर येथे कोणीही कोणाचे नाही हेच वास्तव या झगमगच्या दुनियेचे आहे. बॉलिवूडच्या पेज थ्री पार्टीमध्येही सुशांतला बोलावणे टाळले गेल्याच्या चर्चा रंगत आहेत. अनेकांना सुशांतला मिळालेले यशही खटकत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे हळहळु सुशांतने स्वतःला बॉलिवूडपासून दूर राहणेच पसंत केले.
Putting up long essays on SM doesn't show ur concern. #Kriti and #ShraddhaKapoor didn't post anything yesterday nd stupid people started mocking them..
Today only Kriti, Shraddha, Rhea and Varun Sharma was at his funeral..
Now who is fake and real?— Puja Kashyap (@PujaKas61475324) June 15, 2020
कंगाना रणौतनं सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येसाठी नेपोटिझम आणि बॉलिवूडकरांना जबाबदार धरलं आहे. कंगणाने म्हटले की, 'छिछोरे' सारख्या सर्वोत्कृष्ट सिनेमाला एकही अवार्ड मिळत नाही आणि 'गली बॉय'सारख्या सिनेमाला अनेक अवॉर्ड मिळतात.
या इंडस्ट्रीतले लोक अशाप्रकारे फिल्मी बॅकग्राउंड नसलेल्या कलाकारांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करतात. सुशांतनं असं खचून न जाता अशा लोकांनाच आपल्या कर्तुत्वाने धडा शिकवणे गरजेचे होते.