'एम एस धोनी' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमावले होते 216 कोटी, पण सुशांतला मिळाले होते इतकेच मानधन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 08:00 AM2020-06-20T08:00:00+5:302020-06-20T08:00:01+5:30
रिपोर्टनुसार या सिनेमाचा बजेट जवळपास 104 कोटींचा होता.
सुशांत बॉलिवूडमधील नेपोटिझमचा बळी ठरला सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर अनेकजण बॉलिवूडच्या घराणेशाहीवर टीका करत आहे, काहींनी या प्रकरणाची थेट कोर्टात तक्रार नोंदवली आहे. पोलीस अनेकांचे जबाब नोंदवत आहेत. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवतीची देखील पोलिसांनी चौकशी केली आहे. सुशांतच्या घरातून ५ डायऱ्या ताब्यात घेतल्या असून त्याचा तपास करण्यात येणार आहे.
सुशांत एक लोकप्रिय अभिनेता होता. फार कमी वेळात त्याने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. सुशांतने छोट्या पडद्यावरून आपल्या करिअरची सुरुवात केली. ‘किस देश में हे मेरा दिल’ ही त्याची पहिली मालिका होती. यानंतर एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत सुशांतला संधी मिळाली आणि या एका संधीने त्याचे आयुष्य बदलले.
या मालिकेने सुशांतला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. या मालिकेनंतर सुशांत बॉलिवूडकडे वळला होता. सुशांतने काय पो छे सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली मात्र त्याला खरी ओळख मिळाली ती 'एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमातून. या सिनेमानंतर सुशांत रातोरात स्टार झाला. मीडिया रिपोर्टनुसार या सिनेमाचा बजेट जवळपास 104 कोटींचा होता. एम एस धोनी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 216 कोटींची कमाई केली पण रिपोर्टनुसार या सिनेमासाठी सुशांतल्या फक्त दोन ते अडीच कोटी इतकेच मानधन देण्यात आले होते. मात्र एम एस धोनी सिनेमा रिलीज झाल्यानंतर सुशांतने आपले मानधन दुप्पट केले होते. हे पाहून अनेक निर्मात्यांनी आश्चर्य व्यक्त केले होते.