इंटिमेट सीन आणि भगवद्गीतेचं वाचन, ‘ओपेनहायमर’मधील सीनबाबत पहिल्यांदाच बोलला अभिनेता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 06:49 PM2023-07-27T18:49:06+5:302023-07-27T18:52:36+5:30
‘ओपेनहायमर’ आणि भगवद्गीता वाद: चित्रपटातील 'त्या' वादग्रस्त दृश्यांबाबत अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया
सध्या ‘ओपेनहायमर’ या हॉलिवूड चित्रपटाची सगळीकडे चर्चा आहे. या चित्रपटातील एका दृश्यामुळे हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. वैज्ञानिक रॉबर्ट ‘ओपेनहायमर’ यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात इंटीमेट सीन दरम्यान भगवद्गीतेचं वाचन करतानाचं दृश्य दाखविण्यात आलं आहे. चित्रपटातील या दृश्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. अनेकांनी ओपेनहायमरमधील या दृश्यांबाबत तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
‘ओपेनहायमर’ चित्रपटात सिलियन मर्फी या कलाकाराने मुख्य भूमिका साकारली आहे. मर्फीने पहिल्यांदाच सिनेमातील या सीनवर प्रतिक्रिया दिली आहे. जीक्यूला दिलेल्या मुलाखतीत मर्फीने ‘ओपेनहायमर’मधील त्या वादग्रस्त दृश्यांबाबत भाष्य केलं. ‘ओपेनहायमर’चं रिलेशनशिप कसं होतं, हे दाखवण्यासाठी त्या दृश्याची आवश्यकता असल्याचं मर्फीने सांगितलं. “चित्रपटात सेक्स सीन दाखवणं महत्त्वाचं होतं का?” असा प्रश्न त्याला मुलाखतीत विचारला गेला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना त्याने ‘ओपेनहायमर’मधील त्या वादग्रस्त सीनचं समर्थन केलं.
"मी स्टेजवर घसरुन पडलो अन्...", 'इंडियन आयडॉल' फेम अभिजीत सावंतने सांगितला ‘तो’ किस्सा
“चित्रपटात त्या दृश्याची गरज होती. ओपेनहायमरचं जीनबरोबर असलेलं रिलेशनशिप हा चित्रपटातील भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा भाग आहे. जर त्यामुळे तुमच्या कथेला वेगळं वळण मिळत असेल, तर ते करणं गरजेचं आहे. असे सीन करायला कोणालाही आवडत नाही. पण, आमच्या कामाचा तो एक भाग आहे. त्यामुळे काहीवेळेस ते आम्हाला करावे लागतात,” असं सिलियन मर्फी म्हणाला.
“आमच्या व्हॅनवर ते दगड मारायला...”, अमिषा पटेलने सांगितला ‘गदर २’च्या शूटिंगचा ‘तो’ प्रसंग
दरम्यान, चित्रपटाचे दिग्दर्शक क्रिस्तोफर नोलन यांनीही ‘ओपेनेहायमर’मधील या दृश्यांबद्दल प्रतिक्रिया दिली होती. “जेव्हा तुम्ही ओपेनहायमरच्या जीवनाकडे पाहता तेव्हा त्याचा जीवनाकडे, शारीरिक संबंधाकडे बघण्याचा दृष्टीकोन, स्त्रियांबरोबर असलेलं त्याचं नातं...या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यांचं नातं समजून घेण्यासाठी त्या गोष्टी दाखवणं गरजेचं आहे,” असं नोलन म्हणाले होते.