अभिनेत्री दीपिकाच्या बेबी बंपवर हात ठेऊन ओरीची सिग्नेचर पोज, फोटो चर्चेत!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 09:38 AM2024-07-11T09:38:28+5:302024-07-11T09:40:11+5:30
लवकरच दीपिका बाळाला जन्म देणार आहे.
मॉम टू बी पादुकोण (Deepika Padukone) सध्या चर्चेत आहे. लवकरच दीपिका बाळाला जन्म देणार आहे. नुकतंच दीपिका ही अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Marchant) यांच्या संगीत सोहळ्यात सहभागी झाली होती. या कार्यक्रमातील काही फोटो समोर आले आहेत. यामध्ये सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे दीपिका पादुकोण आणि ओरहान अवत्रमणी ऊर्फ ऑरीच्या एका फोटोनं.
ओरीने सोशल मीडियावर रणवीर आणि दीपिकासह एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोत ओरीने त्याची सिग्नेचर पोज दिली आहे. दीपिकाच्या बेबी बंपवर हात ठेऊन ओरीने फोटो काढल्याचं दिसून येत आहे. तर रणवीरने ओरीच्या खांद्यावर हात ठेऊन फोटो काढला आहे. जांभळ्या रंगाच्या डिझायनर साडीत दीपिका खूपच सुंदर दिसत असून तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लो दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर सध्या चर्चेत आला आहे.
दीपिका ही सध्या ७ महिन्यांची गरोदर आहे आणि सप्टेंबरमध्ये ती बाळाला जन्म देणार आहे. दीपिका पादुकोण आणि रणवीर यांनी 29 फेब्रुवारी 2024 रोजी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. गरोदर असल्याने सध्या, दीपिका ब्रेकवर आहे, कधीकधी ती इव्हेंट्स आणि पार्ट्यांमध्ये किंवा तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसते.
दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास अलिकडेच ती २७ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या 'कल्की 2898 एडी' या चित्रपटात दिसली होती. तर लवकरच दीपिका 'सिंघम अगेन' आणि 'ब्रह्मास्त्र २' सारख्या या बिग बजेट चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तर रणवीर सिंग हा 'डॉन ३' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.