Oscar 2018 : प्री-आॅस्कर पार्टीत ऋचा चढ्ढासोबत सहभागी झाला अली फजल!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2018 04:16 PM2018-03-04T16:16:09+5:302018-03-04T21:46:17+5:30

अली फजल सध्या लॉस एंजेलिसला असून, तो गर्लफ्रेंड ऋचा चढ्ढा हिच्यासोबत प्री-आॅस्कर पार्टीत सहभागी झाला होता. त्याचा एक फोटोही त्याने शेअर केला आहे.

Oscar 2018: Ali Fazal participated in the Pre-Oscars Party with Richa Chadha! | Oscar 2018 : प्री-आॅस्कर पार्टीत ऋचा चढ्ढासोबत सहभागी झाला अली फजल!

Oscar 2018 : प्री-आॅस्कर पार्टीत ऋचा चढ्ढासोबत सहभागी झाला अली फजल!

googlenewsNext
लिवूड अभिनेता अली फजल आणि त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री ऋचा चढ्ढा प्री-आॅस्कर डब्ल्यूएमई पार्टीत सहभागी झाले होते. अलीने रविवारी त्याच्या इन्स्टाग्रामवर ऋचासोबतचा एक फोटो शेअर केला. फोटोचे कॅप्शन देताना त्याने लिहिले की, ‘मी शपथ घेऊन सांगतो हा फोटो काढण्याचा आमचा कुठलाच प्लॅन नव्हता... हाहा! परंतु या फोटोमध्ये जॅक ऊर्फ लिओ हासुद्धा बघावयास मिळत आहे. गर्दीत जेवढे बघता येईल तेवढे पाहा. एका रूममध्ये उत्कृष्ट लोकांसोबत कालची रात्र माझ्यासाठी सन्मानाची ठरली.’ 

यावेळी अलीने त्या अफवांचे खंडन केले, ज्यामध्ये असे म्हटले जात होते की, तो ऋचासोबत ९०व्या अकॅडमी पुरस्कार सोहळ्यात सहभागी होणार आहे. दरम्यान, अलीचा ‘व्हिक्टोरिया अ‍ॅण्ड अब्दुल’ या चित्रपटाला बेस्ट कॉस्ट्यूम डिझाइन आणि मेकअप अ‍ॅण्ड हेअरस्टायलिंग या दोन श्रेणींमध्ये नामांकने मिळाली आहेत. स्टीफन फ्रीर्स यांनी दिग्दर्शित केलेला ‘व्हिक्टोरिया अ‍ॅण्ड अब्दुल’ हा चित्रपट श्रावणी बसू यांच्या कादंबरीवर आधारित आहे. चित्रपटाची कथा राणी व्हिक्टोरिया आणि अब्दुल यांच्यातील नात्यावर आधारित आहे. 
 

दरम्यान, ९०वा आॅस्कर पुरस्कार सोहळा अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये अतिशय दिमाखदारपणे रंगला आहे. जगातील नामांकित दिग्दर्शक आपल्या कलाकारांसोबत या सोहळ्यासाठी पोहोचले आहेत. अमेरिकेच्या ‘एबीसी’ या टीव्ही चॅनेलवर रात्री आठ वाजेपासून या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण सुरू आहे. भारतात सकाळी ५.३० वाजता हा सोहळा दाखविण्यात येईल. 

Web Title: Oscar 2018: Ali Fazal participated in the Pre-Oscars Party with Richa Chadha!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.