म्हणे, ‘गली बॉय’ ऑस्कर जिंकूच शकत नाही!!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 01:41 PM2019-09-22T13:41:50+5:302019-09-22T14:27:22+5:30
चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षकांची दाद मिळवणारा रणवीर सिंग आणि आलिया भट यांचा ‘गली बॉय’ ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीत उतरला आहे तूर्तास ‘गली बॉय’वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पण बॉलिवूडची एक व्यक्ती मात्र यामुळे नाराज आहे.
चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षकांची दाद मिळवणारा रणवीर सिंग आणि आलिया भट यांचा ‘गली बॉय’ ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीत उतरला आहे. ऑस्करच्या ‘बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म’ या श्रेणीसाठी भारताकडून ‘गली बॉय’ची निवड झाली आहे. तूर्तास ‘गली बॉय’वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पण बॉलिवूडची एक व्यक्ती मात्र यामुळे नाराज आहे. ‘गली बॉय’ हा इंग्रजी चित्रपटांची कॉफी आहे. त्यामुळे हा चित्रपट कधीच ऑस्कर जिंकू शकत नाही, असे या व्यक्तिने म्हटलेय. ही व्यक्ती कोण, तर बॉलिवूडचा वादग्रस्त स्वयंघोषीत समीक्षक कमाल आर खान अर्थात केआरके.
Film #GullyBoy has been selected as India’s official entry for the #Oscars2020! No doubt that it’s a good film but it’s copy of few English films. Means India can’t win #Oscar this year also. And we shouldn’t even try to win #Oscar. Why do we need to win #Oscar?
— KRK (@kamaalrkhan) September 21, 2019
केआरके सोशल मीडियावर त्याच्या वादग्रस्त ट्विटमुळे सतत चर्चेत राहतो. ‘गली बॉय’ची ऑस्कर वारीसाठी निवड होताच केआरकेने असेच एक वादग्रस्त ट्विट केले. ‘गली बॉय एक शानदार चित्रपट आहे, यात शंका नाही. पण हा चित्रपट काही हॉलिवूड चित्रपटांची कॉपी आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, यंदाही भारत ऑस्कर जिंकू शकणार नाही. मुळात आपण ऑस्कर जिंकण्याचे प्रयत्नच करू नये. तसेही फिल्मफेअर सारखा नामांकित पुरस्कार असताना आपल्याला ऑस्करची काय गरज?’, असे ट्विट केआरकेने केले आहे.
'Gully Boy' becomes India's official entry to Oscars 2020
— ANI Digital (@ani_digital) September 21, 2019
Read @ANI story | https://t.co/MTJZsYAqbcpic.twitter.com/9Xt42gnZkH
झोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटात झोपडपट्टीत लहानाचा मोठा झालेला आणि आपल्या स्वप्नांसाठी धडपडणाऱ्या २६ वर्षीय डिव्हाइन या प्रसिद्ध रॅपरची कथा दाखविण्यात आली आहे. याआधी मेलबर्नमध्ये पार पडलेल्या भारतीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘गली बॉय’ला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार देण्यात आला होता. दक्षिण कोरियातील २३व्या बुकियॉन इंटरनॅशनल फॅन्टॅस्टिक फिल्म फेस्टिव्हलमध्ये नेटवर्क फॉर द प्रमोशन ऑफ एशियन सिनेमाचा पुरस्कारही ‘गली बॉय’ला मिळाला होता.