​ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दिली गेली ओम पुरी यांना श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2017 10:46 AM2017-02-27T10:46:33+5:302017-02-27T16:16:33+5:30

ऑस्कर पुरस्कारादरम्यान दरवर्षी कला क्षेत्रातील दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली देण्यात येते. यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात कॅरी फिशर, प्रिन्स, जेने वाइल्डर, मायकल ...

Oscar award was honored on the occasion of the death of Om Puri | ​ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दिली गेली ओम पुरी यांना श्रद्धांजली

​ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दिली गेली ओम पुरी यांना श्रद्धांजली

googlenewsNext
्कर पुरस्कारादरम्यान दरवर्षी कला क्षेत्रातील दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली देण्यात येते. यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात कॅरी फिशर, प्रिन्स, जेने वाइल्डर, मायकल किमिनो, पॅटी ड्यूक, गॅरी मार्शल, अँटन येल्चिन, मॅरी टेलर मूर, कर्टिस हॅन्सन आणि जॉन हर्ट यांना श्रद्धांजली वाहाण्यात आली. त्याचसोबत ओम पुरी यांनादेखील या पुरस्कार सोहळ्यात श्रद्धांजली वाहाण्यात आली. ओम पुरी यांनी बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येदेखील आपले प्रस्थ निर्माण केले होते. त्यांनी इस्ट इज इस्ट, गांधी, सिटी ऑफ जॉय, वूल्फ अशा लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले होते. 
कॅलिफोर्नियाच्या डॉल्बी थिएटरमध्ये 89वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी सारा बरेइलिसकडून दिवंगत कलाकारांच्या स्मरणार्थ गीत सादर करून त्यांना श्रद्धांजली वाहाण्यात आली. ऑस्कर सोहळ्यात एक बॉलिवूड अभिनेता म्हणून ओम पुरी यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
ओम पुरी यांनी बॉलिवूडमध्ये आपले प्रस्थ निर्माण केल्यानंतर गांधी या चित्रपटाद्वारे त्यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपटात पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी द पॅरोल ऑफिसर, माय सल द फॅन्टिक यांसारख्या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या. त्यांनी घोस्ट आणि डार्कनेस या चित्रपटात साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. त्यांच्या अभिनयाप्रमाणे त्यांच्या आवाजाचेदेखील कौतुक करण्यात आले होते. 
2017च्या सुरुवातीलाच 6 जानेवारीला ओम पुरी यांचे त्यांच्या राहात्या घरी निधन झाले होते. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली होती. 
ओम पुरू यांनी आक्रोश, अर्धसत्य, चाची 420, मिर्च मसाला, जाने भी दो यारो, हेराफेरी, मालामाल विकली यांसारख्या अनेक चित्रपटात का केले होते. तसेच मिस्टर योगी, तमस या मालिकांमध्ये काम केले होते. 

Web Title: Oscar award was honored on the occasion of the death of Om Puri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.