प्रियंका चोप्राचा Oscar शॉर्टलिस्टेड लघूपट 'अनुजा' ओटीटीवर प्रदर्शित होण्यास सज्ज, कुठे पाहणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 17:29 IST2025-01-15T17:28:17+5:302025-01-15T17:29:19+5:30

"लाइव्ह-अ‍ॅक्शन' शॉर्ट फिल्ममध्ये 'अनुजा' 180 शॉर्ट फिल्मसमधून निवडण्यात आली आहे.

Oscar-shortlisted short film Anuja to stream on Netflix | प्रियंका चोप्राचा Oscar शॉर्टलिस्टेड लघूपट 'अनुजा' ओटीटीवर प्रदर्शित होण्यास सज्ज, कुठे पाहणार?

प्रियंका चोप्राचा Oscar शॉर्टलिस्टेड लघूपट 'अनुजा' ओटीटीवर प्रदर्शित होण्यास सज्ज, कुठे पाहणार?

Anuja OTT Release: 'अनुजा' (Anuja) हा लघूपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. अभिनेत्री प्रियंका चोप्राची (Priyanka Chopra) ऑस्कर शॉर्टलिस्टेड लघुपट 'अनुजा' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.  या भारतीय लघुपटानेही यंदाच्या ऑस्करच्या लघुपट श्रेणीत स्थान मिळवलेले आहे. लाइव्ह-अ‍ॅक्शन' शॉर्ट फिल्ममध्ये 'अनुजा' 180 शॉर्ट फिल्मसमधून निवडण्यात आली आहे. 'अनुजा' हा लघुपट वस्त्रोद्योगातील बालमजुरीच्या समस्येवर आधारित आहे.

'अनुजा' हा लघूपट नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित होणार आहे. पण, अद्याप तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. या लघुपटामध्ये मराठी अभिनेते नागेश भोसले तसेच सजदा पठाण, अनन्या शानभाग, गुलशन वालिया, सुशील परवाना, सुनीता भादुरीया, जुगल किशोर, पंकज गुप्ता, रोडॉल्फो राजीव हुर्बेट सारख्या कलाकारांनी या लघुपटामध्ये अभिनय केला आहे. या सीरिजची प्रियंका ही Executive Producer आहे. 


 प्रियंका चोप्रा शेवटची 'सिटाडेल' या वेबसिरीजमध्ये दिसली होती. याशिवाय चर्चा आहे की अभिनेत्री लवकरच एका बॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे. प्रियांकाच्या हातात हॉलिवूडचे इतरही अनेक मोठे प्रकल्प आहेत, ज्यावर ती काम करणार आहे. सध्या लॉस एंजेलिसमधील आगीमुळे तेथील परिस्थिती खूपच कठीण आहे. अलिकडेच अशी बातमी आली होती की २०२५ चा ऑस्कर पुरस्कार पुढे ढकलण्यात आला आहे. 'वस्त्रोद्योगातील बालमजुरीच्या समस्येवर भाष्य करणारा 'अनुजा' लघुपट बाजी मारतो का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title: Oscar-shortlisted short film Anuja to stream on Netflix

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.