सान्या मल्होत्राला लॉटरी! ऑस्कर विजेत्या निर्मात्या गुनीत मोंगा यांच्यासोबत करणार काम!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 16:00 IST2019-05-05T16:00:00+5:302019-05-05T16:00:02+5:30

‘दंगल गर्ल’ सान्या मल्होत्रा हिच्याकडे चित्रपटांची कमतरता नाही. एकापाठोपाठ एक अशा अनेक चित्रपटांत सान्याची वर्णी लागलीय. आता सान्याच्या हाती असाच एक मोठा चित्रपट लागला आहे.

oscar winner guneet monga to do a film with sanya malhotra | सान्या मल्होत्राला लॉटरी! ऑस्कर विजेत्या निर्मात्या गुनीत मोंगा यांच्यासोबत करणार काम!!

सान्या मल्होत्राला लॉटरी! ऑस्कर विजेत्या निर्मात्या गुनीत मोंगा यांच्यासोबत करणार काम!!

ठळक मुद्देहिंदी चित्रपटाशिवाय गुनीत मोंगा साऊथ इंडस्ट्रीतही हात आजमावत आहेत. तामिळ चित्रपट ‘सूरासाई पोत्रू’ हा चित्रपट त्या प्रोड्यूस करत आहेत.

‘दंगल गर्ल’ सान्या मल्होत्रा हिच्याकडे चित्रपटांची कमतरता नाही. एकापाठोपाठ एक अशा अनेक चित्रपटांत सान्याची वर्णी लागलीय. गतवर्षी सान्या ‘बधाई हो’मध्ये दिसली. या चित्रपटाने केवळ प्रेक्षकांचे मनोरंजनच केले नाही तर बॉक्सआॅफिसवर कमाईचे अनेक विक्रमही रचले. यानंतर सान्याला अनेक मोठे प्रोजेक्ट मिळाले. नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत ‘फोटोग्राफ’ या सिनेमात ती झळकली. पाठोपाठ अनुराग बासूच्या ‘लाईफ इन अ मेट्रो’चा सीक्वलही तिच्या झोळीत पडला. आता सान्याच्या हाती असाच एक मोठा चित्रपट लागला आहे.


होय, ताजी बातमी खरी मानाल तर ऑस्कर विजेत्या निर्मात्या गुनीत मोंगा यांच्या पुढील सिनेमात सान्याची वर्णी लागली आहे. गुनीत मोंगा निर्मित ‘पीरियड एन्ड आॅफ सेंटेंस’ला बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट कॅटिगरी फिल्म श्रेणीत ऑस्कर पुरस्कारने सन्मानित करण्यात आले होते. याच ऑस्कर विजेत्या डॉक्युमेंट्रीच्या निर्मात्या इंडियन फिल्म प्रोड्यूसर गुनीत मोंगा लवकरच एक हिंदी चित्रपट बनवत आहेत. या चित्रपटासाठी सान्याचे नाव फायनल झाले आहे. खुद्द गुनीत मोंगा यांनी हा खुलासा केला. आम्ही एक हिंदी चित्रपट बनवत आहोत. यात सान्या मल्होत्रा लीड रोलमध्ये असेल. हा चित्रपट एका लहानशा शहरातील मुलीची कथा असेल, असे त्यांनी सांगितले.


या हिंदी चित्रपटाशिवाय गुनीत मोंगा साऊथ इंडस्ट्रीतही हात आजमावत आहेत. तामिळ चित्रपट ‘सूरासाई पोत्रू’ हा चित्रपट त्या प्रोड्यूस करत आहेत. यात तामिळ सुपरस्टार सूरिया मुख्य भूमिकेत आहे.

Web Title: oscar winner guneet monga to do a film with sanya malhotra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.