Oscars 2018:ऑस्करसाठी भारताकडून न्यूटन सिनेमाची एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 09:11 AM2017-09-22T09:11:44+5:302017-09-22T14:44:44+5:30
रुपेरी पडद्यावर आजच रसिकांच्या भेटीला आलेला न्यूटन हा सिनेमा ऑस्करसाठी भारताकडून अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवण्यात येणार आहे. ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट ...
र पेरी पडद्यावर आजच रसिकांच्या भेटीला आलेला न्यूटन हा सिनेमा ऑस्करसाठी भारताकडून अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवण्यात येणार आहे. ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट परदेशी सिनेमा गटातील पुरस्कारासाठी न्यूटन या सिनेमाची निवड करण्यात आली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या समितीने ही घोषणा केली आहे. भारताकडून ऑस्कर पुरस्कारासाठी 26 सिनेमा शर्यतीमध्ये होते. न्यूटन या सिनेमात अभिनेता राजकुमार राव याची प्रमुख भूमिका आहे. अमित मसुरकर याने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. राजकुमार रावसह या सिनेमात पंकज त्रिपाठी, संजय मिश्रा, अंजली पाटील, रघुवीर यादव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘जब तक कुछ नहीं बदलोगे, तब तक कुछ नहीं बदलेगा, हा विचार घेऊन आजच हा सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकला आहे. साडेतीनशे स्क्रीन्सवर हा सिनेमा रिलीज झाला आहे. भारताकडून ऑस्करसाठी अधिकृत प्रवेशिका म्हणून न्यूटनची निवड झाल्याबद्दल अभिनेता राजकुमार राव याने ट्विटरवरुन आनंद व्यक्त केला आहे.
या चित्रपटात राजकुमारने न्यूटन नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. पेशाने साधा बाबू असलेल्या न्यूटनला नक्षलवादाने पोळलेल्या छत्तीसगडच्या एका लहानशा गावात स्वतंत्र व निष्पक्ष निवडणूक घ्यायची असते. याच एका ध्येयाने त्याला पछाडलेले असते.२ मिनिट ५६ सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये न्यूटनचा हाच प्रवास दिसतोय. खरे तर सिनेमाचा टीजर रिलीज झाला तेव्हाच याच्या कथेबद्दलची कल्पना प्रेक्षकांना आली होती. चित्रपटात मुख्य पात्र साकारणा-या न्यूटनचे नाव न्यूटन का पडले? लोकांसोबत तो इतके गंभीर का वागतो? याची उत्तर सिनेमातून रसिकांना मिळाली आहेत.
तसेच राजकुमार रावला चौकटीच्या बाहेरील भूमिका करणारा अभिनेता म्हणून ओळखले जाते. राजकुमार राव याला मसालेदार सिनेमा करायची इच्छा होती आणि ती बरेली की बर्फी सिनेमामुळे पूर्ण झाली. 'बरेली की बर्फी'मध्ये तो आयुषमान खुराना आणि क्रिती सॅनन बरोबर डान्स करताना दिसला होता. या सिनेमात राजकुमार रावसह सगळ्या स्टारकास्टचे विशेष कौतुक झाले. आयुषमान आणि क्रितीसह हा सिनेमा करणे राजकुमार रावसाठी हा एक नवीन अनुभव देणारा होता.