Oscars 2023 : फक्त ५० हजारांसाठी Naatu Naatu चा कोरियोग्राफर प्रेम रक्षित आत्महत्या करणार होता, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 03:56 PM2023-03-13T15:56:45+5:302023-03-13T15:57:17+5:30

Naatu Naatu Choreographer Prem Rakshit : RRR या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाच. शिवाय चित्रपटातील नाटू नाटू या गाण्यानं ग्लोल्डन ग्लोब पटकावला, पाठोपाठ ऑस्करवरही नाव कोरलं. सध्या सगळीकडे याच नाटू नाटूची चर्चा सुरू आहे. चित्रपटातील हे गाणं प्रेम रक्षित याने कोरिओग्राफ केलं आहे.

Oscars 2023 Choreographer of 'Natu Natu Song' wanted to commit suicide | Oscars 2023 : फक्त ५० हजारांसाठी Naatu Naatu चा कोरियोग्राफर प्रेम रक्षित आत्महत्या करणार होता, पण...

Oscars 2023 : फक्त ५० हजारांसाठी Naatu Naatu चा कोरियोग्राफर प्रेम रक्षित आत्महत्या करणार होता, पण...

googlenewsNext

Naatu Naatu Choreographer Prem Rakshit : RRR या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाच. शिवाय चित्रपटातील नाटू नाटू या गाण्यानं ग्लोल्डन ग्लोब पटकावला, पाठोपाठ ऑस्करवरही नाव कोरलं. सध्या सगळीकडे याच नाटू नाटूची चर्चा सुरू आहे. चित्रपटातील हे गाणं प्रेम रक्षित याने कोरिओग्राफ केलं आहे. आजवर कुठेही पाहिला नाही असा जबरदस्त डान्स या गाण्यात पाहायला मिळाला. ज्युनिअर एनटीआर व रामचरण या गाण्यात इतक्या वेगवेगळ्या स्टेप करतात, इतकं बेधुंद नाचतात की पाहून अंगावर रोमांच येतात. यामागे कोरिओग्राफर प्रेम रक्षित नावाचा कोरिओग्राफ आहे. प्रेम रक्षित हा साऊथचा नामवंत दिग्गज. नाटू नाटू या गाण्यानंतर आता जगभर त्याचं नाव झालं आहे.

प्रेम रक्षितने १००० हून अधिक गाण्यांवर कोरिओग्राफी केली आहे. त्याने कोरिओग्राफ केलेल्या नाटू नाटू गाण्याला ऑस्कर सारखा प्रतिष्ठीत पुरस्कार मिळणं, ही त्याच्यासाठी मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे. मात्र आज जगभर नावारुपास आलेला हाच प्रेम रक्षित एक दिवस आत्महत्या करायला गेला होता...

प्रेम रक्षितची स्ट्रगल स्टोरी...
प्रेम रक्षित कोरिओग्राफर कसा बनला, याची कथा फारच इंटरेस्टिंग आहे. एकेकाळी प्रेम रक्षितचं कुटुंब सधन कुटुंब होतं. वडिल हिऱ्यांचे व्यापारी होते. मात्र कौटुंबिक वादामुळे रक्षितच्या वडिलांना या व्यवसायातून बाहेर पडावं लागलं. त्यानंतर मात्र सगळंच बदललं. कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावू लागली. हिऱ्यांचा व्यापार बंद झाल्यावर प्रेम रक्षितच्या वडिलांनी नृत्य दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरूवात केली. ते उत्तम डान्सर होतं. पण पैसा फार नव्हता. अखेर वडिलांना मदत व्हावी म्हणून रक्षित एका कपडे शिवण्याच्या दुकानात कामाला लागला. यामुळे भागणार नव्हतंच. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणखीच हलाखीची होत गेली.

बालपणी श्रीमंती उपभोगलेल्या रक्षितला हे पाहावेना. आईवडिलांचे हाल बघवेनात. अखेर त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला.  आत्महत्या केली तर आपल्या पश्चात कुटुंबाला फेडरेशन मधून ५० हजार रुपये मिळतील. ज्यामुळे कुटुंबावरचा बरंच आर्थिक ताण कमी होईल, हा त्याचा उद्देश होता. हाच विचार मनात घेऊन रक्षितने उधरीची सायकल घेतली आणि तो चेन्नईच्या मरीना बीच वर आत्महत्या करण्यासाठी गेला. पण आत्महत्या करताना त्या उधारीच्या सायकलीचं काय करायचं असा विचार त्याच्या मनात आला. मी गेल्यानंतर ते लोक सायकल मागायला घरी गेलेत तर काय होईल, या एका विचाराने तो मागे वळला. तोच त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला. घरी जाताच एक आनंदाची बातमी त्याला ऐकायला मिळाली. त्याच्या वडिलांना एका चित्रपटात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम मिळालं होतं. त्यानंतर त्यांच्या घरची परिस्थिती हळूहळू बदलत गेली. पुढे रक्षितही नृत्य दिग्दर्शनाकडे वळला. आज याच रक्षितने कोरिओग्राफ केलेल्या नाटू नाटूला ऑस्कर मिळाला आहे...

Web Title: Oscars 2023 Choreographer of 'Natu Natu Song' wanted to commit suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.