Chhaava Movie : "२ मिनिटं आपले राजे हसले आणि तेही आपल्याला...", आशिष पाथोडे 'छावा'मधील लेझीम सीनवर स्पष्टच बोलला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 19:05 IST2025-03-19T19:04:42+5:302025-03-19T19:05:30+5:30
Chhaava Movie : ‘छावा' या चित्रपटात अंताजी यांची भूमिका आशिष पाथोडेने साकारली आहे. या भूमिकेलादेखील प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले. दरम्यान अलिकडेच एका मुलाखतीत आशिष पाथोडे(Ashish Pathode)नं छावा चित्रपटातून डिलिट केलेल्या लेझीम नृत्याच्या सीनवर आपलं मत व्यक्त केले आहे.

Chhaava Movie : "२ मिनिटं आपले राजे हसले आणि तेही आपल्याला...", आशिष पाथोडे 'छावा'मधील लेझीम सीनवर स्पष्टच बोलला
१४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेला ‘छावा'(Chhaava) चित्रपट चांगलाच गाजल्याचे पाहायला मिळत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाची आजही बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटात विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना यांच्याशिवाय बरेच मराठी कलाकारांनी काम केले आहे. या चित्रपटात अंताजी यांची भूमिका आशिष पाथोडेने साकारली आहे. या भूमिकेलादेखील प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले. दरम्यान अलिकडेच एका मुलाखतीत आशिष पाथोडे(Ashish Pathode)नं छावा चित्रपटातून डिलिट केलेल्या लेझीम नृत्याच्या सीनवर आपलं मत व्यक्त केले आहे.
अभिनेता आशिष पाथोडेने छावा सिनेमातून लेझीम नृत्याचा सीन डिलिट केला, त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्याने हे राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत यावर भाष्य केले आहे. तो म्हणाला की, ''सीक्वेन्स असा होता की औक्षण वगैरे झाला. नगाडा, ढोल लेझीम नृत्य सुरू आहे. लेझीम नृत्य करता करता दोन मावळे राजेंजवळ येतात आणि त्यांना लेझीम खेळायला सांगतात. तेव्हा राजे राणींकडे पाहतात. मग राणी इशाऱ्यांमधून त्यांना खेळण्यासाठी सांगतात. आपली प्रजा आहे तर त्यांच्यासाठी करा. ते जातात आणि नृत्य करतात. हे तुम्ही ट्रेलरमध्ये पाहिले. मग राणी साहेब आणि आम्हीदेखील त्यांना जॉईन करतो. या पद्धतीचे ते वातावरण होते. इतकं सकारात्मक होतं. ते इतकं भव्यदिव्य होतं की कदाचित मला वाटतं प्रेक्षकांनी तो माहौल डोक्यावर घेतला असता.''
''राजांमुळे आपण आज सुरक्षित आहोत...''
तो पुढे म्हणाला की, ''मराठी राजांचा इतिहास तो किती श्रीमंत होता आणि काय लेवलचा होता, ते या सगळ्या गोष्टींचं सादरीकरण होते. त्यात नम्रपणा, प्रामाणिकपणा होता आणि तो लोकांपर्यंत पोहचवण्याचा त्यात सरांचा मावळा म्हणून, व्यक्ती म्हणून, एक इतिहासप्रेमी, त्या पद्धतीचा दूरदर्शी दिग्दर्शक म्हणून एक हेतू होता. हे लोकांपर्यंत पोहचले असता तर एका वेगळ्या लेव्हलवर सिनेमा गेला असता. एका किर्तनकारांचा मी रिल पाहिला होता. ते म्हणाले अख्खं जग या सिनेमाला डोक्यावर घेत आहे आणि आपलाच एक मराठी माणूस हे असं का म्हणतोय. करायला पाहिजे. दोन मिनिटं आपले राजे हसताना बघवत नाहीत. ज्या माणसाने आपल्या स्वराज्यासाठी यातना सहन केल्या. खरंच त्यांची पुण्याई आहे. त्यांनी हाल सहन केले म्हणून आज आपण सुरक्षित आहोत.''