भारतीय जेवणाला 'भयानक' बोलणाऱ्या परदेशी व्यक्तीवर भडकली ही मॉडेल, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 04:54 PM2019-11-25T16:54:47+5:302019-11-25T16:55:10+5:30

प्रसिद्ध मॉडेल व टॉप शेफच्या होस्टनं ट्विटरवर एका परदेशी व्यक्तीला खडेबोल सुनावले आहेत.

Padma Lakshmi Takes To Man Who Called Indian Food Terrible | भारतीय जेवणाला 'भयानक' बोलणाऱ्या परदेशी व्यक्तीवर भडकली ही मॉडेल, वाचा सविस्तर

भारतीय जेवणाला 'भयानक' बोलणाऱ्या परदेशी व्यक्तीवर भडकली ही मॉडेल, वाचा सविस्तर

googlenewsNext

प्रसिद्ध मॉडेल व टॉप शेफ शोची सूत्रसंचालक पद्मा लक्ष्मीने ट्विटरवर एका परदेशी व्यक्तीला खडेबोल सुनावले आहेत. खरेतर या व्यक्ती भारतीय जेवणाला नाव ठेवले हे तिला अजिबात पटले नाही आणि त्यामुळेच तिने त्या व्यक्तीला चांगलेच सुनावले. 

टॉम निकोलस या व्यक्तीने लिहिले की, भारतीय जेवण खूप भयानक आहे आणि आम्ही दिखावा करतो की हे नाही आहे. त्याला उत्तर देत पद्मा लक्ष्मीने लिहिलं की, तुम्हाला जेवण टेस्ट करता येते का?


काही दिवसांपूर्वी पद्मा लक्ष्मीने तिला आलेल्या वाईट अनुभवाबाबतचा खुलासा केला होता. हे ऐकून सगळेच हैराण झाले होते. खरेतर सुप्रीम कोर्टाचे जज ब्रेट कैवनागवर लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या महिलेवर अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रंप यांनी सवाल केला होता की त्या इतकी वर्षे शांत का होती? या प्रश्नानंतर पद्मा लक्ष्मी समोर आली.
त्यावेळी पद्मा लक्ष्मीने पहिल्यांदा स्वीकारले की किशोरवयात तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले आहेत.ती म्हणाली की, लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या महिल्यांच्या वेदना ती चांगल्यारित्या समजते. जे कित्येक वर्ष आपल्यावर झालेल्या अत्याचारांवर गप्प बसल्या आहेत.


पद्मा लक्ष्मी म्हणाली की, कैवनागवर लैंगिक शोषणाचा आरोप करणारी क्रिस्टीन ब्लेजी फोर्ड इतके वर्ष शांत का बसली असेल ही गोष्ट मला समजते आहे.

न्यूयॉर्क टाईम्समध्ये लिहिलेल्या लेखात पद्मा लक्ष्मीने स्वीकार केले की, वयाच्या १६ व्या वर्षी तिच्या बॉयफ्रेंडने तिच्यासोबत वाईट कृत्य केले होते. याची तक्रार केली नाही कारण तिला वाटत होते की यात तिचीदेखील चूक आहे.


 

Web Title: Padma Lakshmi Takes To Man Who Called Indian Food Terrible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.