पद्मश्री पुरस्कार प्राप्त अभिनेत्री सुप्रिया देवी यांचे निधन!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2018 08:47 AM2018-01-26T08:47:50+5:302018-01-26T14:18:16+5:30
पश्चिम बंगालच्या प्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया देवी यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी आज कोलकाता येथे निधन झाले. सुप्रिया देवी या ...
प ्चिम बंगालच्या प्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया देवी यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी आज कोलकाता येथे निधन झाले. सुप्रिया देवी या नावाने प्रसिद्ध असलेल्या सुप्रिया चौधरी यांना २०१४ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जवळपास ५० वर्ष त्यांनी बंगाली चित्रपटांमध्ये आपले योगदाान दिले. सुप्रिया देवी यांना ऋत्विक घटक यांच्या ‘मेघे ढाका तारा’ या बंगाली चित्रपटासाठी ओळखले जाते. २०११ मध्ये त्यांना बंग विभूषणनेही सन्मानित करण्यात आले आहे.
सुप्रिया देवी यांचा जन्म म्यानमार येथे झाला होता. त्याठिकाणी त्यांचे वडील गोपाल चंद्र बॅनर्जी वकील होते. सुप्रिया देवी यांच्या निधनामुळे संपूर्ण बंगालमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. सुप्रिया देवी यांनी ‘मेघे ढाका तारा’ व्यतिरिक्त सन्यासी राजा, स्वरलिपी, कोमल गांधार, अनारकली’ आदी चित्रपटांमध्ये आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाची झलक दाखविली.
१९३३ मध्ये जन्मलेल्या सुप्र्रिया देवी यांनी जवळपास पाच दशकांपेक्षा अधिक काळ चित्रपटसृष्टीत काम केले. त्यांनी उत्तम कुमारसोबत १९५२ मध्ये ‘बासु परिवार’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. पुढे १९५९ साली ‘सोनार हरिन’ या चित्रपटानंतर त्यांचा इंडस्ट्रीतील प्रवास खºया अर्थाने सुरु झाला. या चित्रपटातही त्यांनी उत्तम कुमारसोबत काम केले होते.