Padmaavat Box Office Collection : पहिल्याच दिवशी ‘पद्मावत’ने केली इतकी कमाई!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 10:35 AM2018-01-25T10:35:35+5:302018-01-25T16:05:44+5:30

प्रचंड वादाच्या भोवºयात सापडलेल्या ‘पद्मावत’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी जोरदार कमाई केली. आतापर्यंतच्या आकड्यांवरून हा चित्रपट चांगली मजल मारेल, असेच काहीसे दिसत आहे.

Padmaavat Box Office Collection: So much money earned by Padmavat on the very first day! | Padmaavat Box Office Collection : पहिल्याच दिवशी ‘पद्मावत’ने केली इतकी कमाई!

Padmaavat Box Office Collection : पहिल्याच दिवशी ‘पद्मावत’ने केली इतकी कमाई!

googlenewsNext
ग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावत’ प्रचंड वादानंतर अखेर आज (दि.२५) रिलीज झाला आहे. अगोदरच वादाच्या भोवºयात सापडलेला हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर किती कमाई करेल? याविषयी सध्या प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. परंतु पहिल्या दिवशी ज्यापद्धतीने चित्रपटाचे कलेक्शन समोर येत आहे, त्यावरून चित्रपट बॉक्स आॅफिसवर सुपरहिट ठरेल असेच काहीसे संकेत दिसत आहेत. गेल्या बुधवारी वादग्रस्त ‘पद्मावत’चे पेड प्रीव्ह्यू देशभरात सादर करण्यात आले, ज्यामध्ये चित्रपटाने जोरदार कमाई केली. बॉक्स आॅफिसच्या नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने ३डी स्क्रीन्सच्या माध्यमातून जवळपास ४ कोटी रुपयांचे कलेक्शन केले. तर दुसरीकडे सुपर सिनेमा ट्रेड मॅगझिनने दिलेल्या माहितीनुसार, चित्रपट देशभरात १५०० स्क्रीनवर रिलीज करण्यात आला असून, आतापर्यंत जवळपास ४.४५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. 

दीपिका पादुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर स्टारर ‘पद्मावत’च्या निर्मितीसाठी सुमारे २०० कोटी रुपयांचा खर्च आला. मात्र सुरुवातीपासूनच चित्रपट वादाच्या भोवºयात सापडल्याने चित्रपट निर्मितीचा तरी खर्च वसूल करणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र ज्यापद्धतीने रिलीजच्या पहिल्याच दिवशी कमाईचे आकडे समोर आले त्यावरून चित्रपट रेकॉर्डब्रेक कमाई करेल, असेच काहीसे दिसत आहे. दरम्यान, बुधवारी दीपिकाला मोस्ट स्टायलिश अवॉर्ड समारंभात कलेक्शनविषयी विचारण्यात आले असता तिने म्हटले होते की, ‘मी सध्या खूपच भावुक आहे. मी कधीच बॉक्स आॅफिसवरील कमाईवरून उत्साहित नसते; मात्र यावेळेस मी खूपच उत्साहित आहे. मला असे वाटते की, चित्रपट धमाकेदार कमाई करेल. 
 

तर रणवीर सिंगने म्हटले होते की, ‘संपूर्ण देशाला ‘पद्मावत’वर गर्व असायला हवा.’ रणवीरने ट्विटरच्या माध्यमातूनही ‘पद्मावत’मध्ये काम केल्याने स्वत:ला नशीबवान समजत असल्याचे म्हटले होते. दरम्यान, चित्रपट रिलीज झाला असला तरी, अजूनही वाद सुरूच असल्याने त्याचा परिणाम कमाईवर होतो काय? हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. 

Web Title: Padmaavat Box Office Collection: So much money earned by Padmavat on the very first day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.