PadMan Box Office Collection : ‘पॅडमॅन’चे पॅकअप, इतकी केली कमाई!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2018 10:01 AM2018-02-23T10:01:07+5:302018-02-23T15:31:15+5:30
खिलाडी अक्षयकुमारच्या ‘पॅडमॅन’ने बॉक्स आॅफिसवरून पॅकअप केले आहे. आतापर्यंत या चित्रपटाने इतक्या कोटींपर्यंतच मजल मारली आहे.
ब लिवूडचा खिलाडी अक्षयकुमार अभिनित आणि ट्विंकल खन्ना निर्मित ‘पॅडमॅन’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर आपला प्रभाव दाखविण्यात अपयशी ठरला आहे. जेमतेम कमाई करीत चित्रपटाने निर्मितीचा खर्च वसूल केला असला तरी आपल्या लौकिकाला साजेशी कमाई करण्यात मात्र अपयशी ठरला आहे. ‘सॅनिटरी पॅड’ यावर आधारित असलेल्या या चित्रपटात अक्षयकुमारचा अभिनय मात्र सर्वच अंगांनी सरस ठरला आहे. १४ व्या दिवसापर्यंत चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर ७५.५० कोटी रुपयांची कमाई केली.
रिलीजच्या पहिल्या आठवड्यात ‘पॅडमॅन’ने ६२ कोटी रुपये कमावले. दुसºया आठवड्यात मात्र चित्रपट १३.५० कोटी रुपयांपर्यंतच मजल मारू शकला. सुरुवातीला अशी शक्यता वर्तविली जात होती की, हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवेल. परंतु आतापर्यंत ज्या पद्धतीने चित्रपटाने कमाई केली त्यावरून ही आशा आता धूसर दिसत आहे. कारण ‘पॅडमॅन’नंतर बॉक्स आॅफिसवर ‘अय्यारी’ आणि ‘ब्लॅक पॅँथर’ हे दोन चित्रपट रिलीज झाले. ‘अय्यारी’ला जरी म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नसला तरी, ‘ब्लॅक पॅँथर’ या बॉलिवूडपटाला मात्र प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. याचा परिणाम ‘पॅडमॅन’च्याही कमाईवर दिसून येत आहे.
दरम्यान, ‘पॅडमॅन’नंतर अक्षयकुमार आगामी ‘गोल्ड’ या चित्रपटात बघावयास मिळणार आहे. रीमा कागती दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माता रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर आहेत. या चित्रपटातून लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरला सुरुवात करीत आहे. चित्रपटात अमित साधचीही भूमिका महत्त्वपूर्ण आहे.