‘पॅडमॅन’ अक्षयकुमार साधणार ‘लोकमत सखी मंच’ सभासदांशी संवाद!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2018 02:21 PM2018-01-13T14:21:52+5:302018-01-13T20:15:57+5:30

बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार अतिशय हटके अंदाजात आपल्या चाहत्यांसमोर जाण्यास सज्ज आहे. होय, आम्ही त्याच्या आगामी ‘पॅडमॅन’ या चित्रपटाबद्दल सांगत ...

'Padmana' will be organized by Akshay Kumar, 'Lokmat Sakhi Forum' to interact with members! | ‘पॅडमॅन’ अक्षयकुमार साधणार ‘लोकमत सखी मंच’ सभासदांशी संवाद!

‘पॅडमॅन’ अक्षयकुमार साधणार ‘लोकमत सखी मंच’ सभासदांशी संवाद!

googlenewsNext
लिवूडचा खिलाडी अक्षयकुमार अतिशय हटके अंदाजात आपल्या चाहत्यांसमोर जाण्यास सज्ज आहे. होय, आम्ही त्याच्या आगामी ‘पॅडमॅन’ या चित्रपटाबद्दल सांगत असून, तो या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा एका महत्त्वपूर्ण विषयावर प्रबोधन करताना दिसणार आहे. सध्या चाहत्यांना त्याच्या या चित्रपटाची प्रतीक्षा असून, अनेकांना चित्रपटातील त्याच्या भूमिकेबद्दल जाणून घेण्याची तीव्र इच्छा आहे. अशात नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ‘लोकमत’ने सखी मंच सभासदासाठी हा योग जुळून आणला असून, मेगास्टार अक्षयकुमारसोबत त्यांना समोरासमोर संवाद साधता येणार आहे.

होय, येत्या सोमवारी (दि.१५) अक्षय पुणे येथील ईशान्य शॉपिंग मॉलजवळील, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड येथे असलेल्या गेनबा सोपानराव मोझे प्रशाला येथे सखी मंच सभासदांशी संवाद साधण्यासाठी उपस्थित राहणार आहे. यावेळी तो उपस्थितांबरोबर ‘पॅडमन’ या चित्रपटाबद्दल दिलखुलास संवाद साधणार आहे. त्याचबरोबर उपस्थित सखींनाही त्यांच्या मनात असलेले सर्व प्रश्न अक्षयला विचारता येतील. या संवाद सत्रातून एका भाग्यवान विजेत्याला दस्तुरखुद्द अक्षयकुमारच्या हस्ते एक आकर्षक बक्षिसही जिंकण्याची संधी आहे. 



अक्षय नेहमीच त्याच्या चाहत्यांमध्ये रमणे पसंत करतो. जेव्हा तो चाहत्यांसोबत असतो, तेव्हा स्टारपण विसरून त्यांच्यात मिसळतो. असाच काहीसा अनुभव याठिकाणी येण्याची शक्यता आहे. दरम्यान, सखी मंच सभासदांनाही अक्षयला भेटण्याची आतुरता आहे. दरम्यान, अक्षयकुमारचा ‘पॅडमॅन’ हा चित्रपट अरुणाचल  येथील मुरु गनाथम संघर्षमय कथेवर आधारित आहे. दुर्गम भागातील महिलांसाठी स्वस्त सॅनिटरी पॅड तयार करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न या चित्रपटात दाखविण्यात येणार आहे. ‘सुपर हीरो है ये पगला’ अशी टॅगलाइन असलेल्या या चित्रपटात अक्षयसोबत राधिका आपटे आणि सोनम कपूूर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.  

बॉलिवूडचा अ‍ॅक्शन हीरो अशी ओळख असलेला अक्षय कुमार गेल्या काही वर्षांपासून सामाजिक विषयाला वाहिलेल्या चित्रपटांच्या माध्यमातून समीक्षकांचे लक्ष वेधत आहे. या दरम्यान त्याने काही वेगळ्या धाटणीचे चित्रपट केले आहेत. त्याचा ‘पॅडमॅन’ हा चित्रपटदेखील याच पठडीतला आहे. यापूर्वी अक्षय ‘टॉयलेट :  एक प्रेमकथा’ या चित्रपटात एका महत्त्वपूर्ण सामाजिक विषयावर प्रबोधन  करताना दिसला. 

वेळ : १५ जानेवारी २०१८ रोजी दुपारी २ वाजता. 
स्थळ : गेनबा सोपानराव मोझे प्रशाला, महाराष्टÑ हाऊसिंग बोर्ड, ईशान्य शॉपिंग मॉलजवळ, येरवडा, पुणे ०६.

Web Title: 'Padmana' will be organized by Akshay Kumar, 'Lokmat Sakhi Forum' to interact with members!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.