padmavati controversy: ​ ‘भन्साळींचे शिर कापा’ ते ‘दीपिकाचे नाक कापू’पर्यंत ‘पद्मावती’बद्दलची ८ वादग्रस्त वक्तवे...!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 07:21 AM2017-11-17T07:21:25+5:302017-11-17T12:51:25+5:30

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ला होत असलेला विरोध अधिक तीव्र झाला आहे. कुणी भन्साळींना मारण्याची धमकी देत आहे तर ...

padmavati controversy: 8 controversial statements about 'Padmavati' from 'Bhansali's head kapapa' to 'Kapil Nip Kapu' ...! | padmavati controversy: ​ ‘भन्साळींचे शिर कापा’ ते ‘दीपिकाचे नाक कापू’पर्यंत ‘पद्मावती’बद्दलची ८ वादग्रस्त वक्तवे...!

padmavati controversy: ​ ‘भन्साळींचे शिर कापा’ ते ‘दीपिकाचे नाक कापू’पर्यंत ‘पद्मावती’बद्दलची ८ वादग्रस्त वक्तवे...!

googlenewsNext
जय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ला होत असलेला विरोध अधिक तीव्र झाला आहे. कुणी भन्साळींना मारण्याची धमकी देत आहे तर कुणी या चित्रपटात राणी पद्मावतीची भूमिका साकारणा-या दीपिकाला नाक कापण्याची धमकी देत आहे. केंद्रीय मंत्री उमा भारतींपासून करणी सेनेच्या सदस्यांपर्यंत  कुणीही बयानबाजीत मागे नाही. ‘पद्मावती’विरोधातील अशाच काही बयानांवर एक नजर....


‘पद्मावती’ सिनेमामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेल्या दीपिका पादुकोणला आता राजपूत करणी सेनेने धमकी दिली आहे.  ज्याप्रमाणे लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले होते, त्याप्रमाणे करणी सैनिकही तुझे नाक कापू शकतात , असा इशाराच करणी सेनेचे राजस्थान प्रदेशाध्यक्ष महिपाल मकराणा यांनी दिला आहे.

मेरठच्या एका राजपूत नेत्याने भन्साळींविरोधात फतवा काढला आहे. भन्साळींचे शिर आणून देणºयास पाच कोटींचे इनाम देऊ, असे या नेत्याने म्हटले आहे. यानंतर भन्साळींच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

राजपूत सेनेच्या नावाने असलेल्या फेसबुक पेजवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये,पद्मावती चित्रपटाची तिकीट काढण्यापूर्वी स्वत:चा विमा काढून घ्या. कारण, राजपूत शिरच्छेद करताना विचार करत नाहीत, असे लिहिलेयं.

‘पद्मावती’ चि़त्रपटावर बंदी घातली पाहिजे. चित्रपट सृष्टीला कुठली अस्मिता किंवा राष्ट्रवादाशी काही देणे घेणे नाही. त्यांना फक्त पैसा हवा आहे. यासाठी ते नग्न नाचण्यासही तयार होतील, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी केले आहे.

थोड्याफार पैशांसाठी इतिहासाची मोडतोड करुन चित्रपटाची निर्मिती करणे अतिशय लज्जास्पद आहे.  भन्साळीसारख्या लोकांना दुसरी कोणतीही भाषा समजत नाही. त्यांना फक्त चपलांची भाषा समजते,असे मध्य प्रदेशच्या उज्जैनचे खासदार असलेल्या चिंतामणी मालवीय यांनी म्हटले आहे.

भन्साळी किंवा इतर कोणत्याही दिग्दर्शकात इतर धर्मावर सिनेमा काढण्याची किंवा त्यावर साधे भाष्य करण्याची हिंमत आहे का? असा प्रश्न केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी उपस्थित केला आहे.

‘पद्मावती’ला राजपूतांशी न जोडता त्याला भारतीय स्त्रीच्या अस्मितेशी जोडले जावे. तसेच या चित्रपटाशी निगडीत वाद मिटवण्यासाठी एक समिती तयार करून त्यांनी तोडगा काढावा, असे केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी म्हटले आहे.

ALSO READ: ‘पद्मावती’ रिलीज होणारच! दीपिका पादुकोणने विरोधकांना सुनावले !

cnxoldfiles/strong> सुब्रमण्यम स्वामी यांनी दीपिकाला लक्ष्य केले आहे. ‘पद्मावती’च्या बजेटची चौकशी व्हायला हवी. चित्रपटाच्या रिलीजला विरोध होणे हे मागासलेपणाचे लक्षण आहे, असे दीपिका म्हणतेय.असे म्हणून दीपिकाने स्वत:चेच मागासलेपण सिद्ध केले. तिने पुन्हा शिकले पाहिजे, असे स्वामींनी म्हटले.

Web Title: padmavati controversy: 8 controversial statements about 'Padmavati' from 'Bhansali's head kapapa' to 'Kapil Nip Kapu' ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.