padmavati controversy : माफ करा, पण ‘पद्मावती’चे प्रदर्शन वाटू लागलेयं अशक्य!!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2017 09:31 AM2017-11-29T09:31:32+5:302017-11-29T15:01:32+5:30
तुम्ही सगळे ‘पद्मावती’ची किती आतुरतेने प्रतीक्षा करत आहात, हे आम्ही जाणतो. पण पुढची बातमी लिहिण्याआधीच आम्ही आमच्या वाचकांची माफी ...
त म्ही सगळे ‘पद्मावती’ची किती आतुरतेने प्रतीक्षा करत आहात, हे आम्ही जाणतो. पण पुढची बातमी लिहिण्याआधीच आम्ही आमच्या वाचकांची माफी मागतो. माफ करा, पण ‘पद्मावती’चे प्रदर्शन कठीणचं नाही तर अशक्य वाटू लागलेंय. होय, याला कारणही तसेच आहे.
आजपर्यंत कुठल्याही चित्रपटाला झाला नाही, इतका विरोध या चित्रपटाला होतो आहे. अगदी ‘पद्मावती’चे शूटींग सुरु झाले त्या दिवसांपासून हा चित्रपट वादात सापडला आहे. आता तर ‘पद्मावती’विरोधातील देशातील वातावरण कमालीचे तापले आहे. राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, राजस्थानातील राजघराणे, धर्मगुरु अशा अनेकांनी या चित्रपटाविरोधात मोर्चा उघडला आहे. ‘पद्मावती’त ऐतिहासिक तथ्यांशी छेडछाड करण्यात आल्याचा या सर्वांचा आरोप आहे. हा वाद सुप्रीम कोर्टापर्यंतही पोहोचला आहे. सुप्रीम कोर्टाने निर्णयाचा चेंडू सेन्सॉर बोर्डाच्या कोर्टात टोलवला असला तरी सेन्सॉर बोर्ड अद्यापही चित्रपटावर चुप्पी साधून आहे. शेवटी सेन्सॉर बोर्डाला कुठल्याही स्थितीत देशातील शांतता धोक्यात घालायची नाही. चित्रपटाच्या बाजूने निर्णय घेतला तर देशातील वातावरण बिघडू शकते आणि चित्रपटाच्या विरोधात निर्णय घेतला तर इंडस्ट्रीचा रोष ओढवून घ्यावा लागू शकतो. त्यामुळे सेन्सॉर बोर्ड संभ्रमात आहे. एकंदर काय तर त्यामुळेच ‘पद्मावती’च्या रिलीजचे काम ठप्प पडले आहे.
ALSO READ : ‘पद्मावती’वर बेजबाबदार वक्तव्ये करणा-यांना सर्वोच्च न्यायालयाची चपराक! विदेशातील बंदीची याचिका खारिज!
‘पद्मावती’चे रिलीज अशक्य वाटण्यामागे आणखीही काही कारणे आहेत. हे कारण म्हणजे, या चित्रपटाला होणारा सर्वव्यापी विरोध. राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, बिहार अशा अनेक राज्यांत या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी लादण्यात आली आहे. त्यातच जयपूरच्या नाहरगड किल्लयावर एका व्यक्तिचा मृतदेह सापडला आहे. या मृतदेहाच्या बाजूला आढळलेल्या दगडांवर ‘पद्मावती’विरोधातील संदेश लिहिलेला होता. काल-परवा नवी दिल्लीतही एका मेट्रो स्थानकाबाहेर काही लोकांनी ‘पद्मावती’चे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पुतळ्याचे दहन केले होते. केवळ इतकेच नाही तर काहींनी भन्साळी व या चित्रपटाची अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचे शिर कापणाºयास १० कोटींचे बक्षिस जाहिर केले आहे. या धमक्यांमुळे ‘पद्मावती’च्या सर्व कलाकारांच्या घराबाहेर सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. गुजरातमध्ये येत्या काळात विधानसभा निवडणुका आहेत. उत्तर प्रदेशात स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका आहेत. अशा वातावरण ‘पद्मावती’च्या रिलीजची प्रतीक्षा करणाºयांच्या पदरी निराशाचं पडण्याची शक्यता अधिक आहे. पुढे काय घडतं, ते बघूच.