Padmavati Controversy : ​सुप्रीम कोर्टाचा दिलासा! आता ‘पद्मावती’च्या वादाचा चेंडू सेन्सॉर बोर्डाच्या कोर्टात!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2017 08:48 AM2017-11-10T08:48:47+5:302017-11-10T14:18:47+5:30

संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावती’ला अनेक स्तरावर विरोध होत असताना सुप्रीम कोर्टाने मात्र भन्साळींना दिलासा दिला आहे. होय, ‘पद्मावती’च्या रिलीजवर ...

Padmavati Controversy: Supreme Court relief! Now the promise of 'Padmavati' in the Censor Board! | Padmavati Controversy : ​सुप्रीम कोर्टाचा दिलासा! आता ‘पद्मावती’च्या वादाचा चेंडू सेन्सॉर बोर्डाच्या कोर्टात!

Padmavati Controversy : ​सुप्रीम कोर्टाचा दिलासा! आता ‘पद्मावती’च्या वादाचा चेंडू सेन्सॉर बोर्डाच्या कोर्टात!

googlenewsNext
जय लीला भन्साळींच्या ‘पद्मावती’ला अनेक स्तरावर विरोध होत असताना सुप्रीम कोर्टाने मात्र भन्साळींना दिलासा दिला आहे. होय, ‘पद्मावती’च्या रिलीजवर बंदी घालण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. विशेष म्हणजे, आता ‘पद्मावती’च्या रिलीजचा वाद सेन्सॉर बोर्डाच्या कोर्टात आला आहे. कारण ‘पद्मावती’ रिलीज व्हावा की नाही, याचा निर्णय सेन्सॉर बोर्ड घेईल, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

आज शुक्रवारी सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए.एम. खानविलकर आणि न्या. डी. वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी केली. प्रत्येक चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यापूर्वी सेन्सॉर बोर्ड सर्व पैलंूवर विचार करतो. सेन्सॉर बोर्डाकडे पुरेसे दिशानिर्देश आहेत. त्यामुळे ‘पद्मावती’संदर्भातही सेन्सॉर बोर्डानेच निर्णय घ्यावा, असे या खंडपीठाने स्पष्ट केले.
   पेशाने वकील असलेले सोमेश चंद्रा झा यांनी ‘पद्मावती’च्या मेकर्सविरोधात एक याचिका दाखल केली होती. ‘पद्मावती’त तथ्यांशी छेडछाड करण्यात आल्याचा आरोप झा यांनी केला होता.  ‘पद्मावती’विरोधातील संताप वाढतो आहे. चित्रपट रिलीज झालाच तर हे प्रकरण चिघळू शकते. ट्रेलरमध्ये राणी पद्मावतीला नृत्य करताना दाखवले आहे. पण राजघराण्यातील स्त्रिया कधीच असले नृत्य करत नसत. ही ऐतिहासिक तथ्यांसोबत खेळण्याचा प्रकार आहे, असेही झा यांनी संबंधित याचिकेत म्हटले होते. केवळ इतकेच नाही तर या चित्रपटात राणी पद्मावतीच्या भूमिकेत असलेल्या दीपिकाच्या कपड्यांवरही त्यांनी आक्षेप नोंदवला होता.

ALSO READ: ​padmavati controversy : कधीच फ्लॉप होऊ शकत नाही ‘पद्मावती’! वाचा कारण!!

कालच ‘पद्मावती’चे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर स्पष्टीकरण दिले होते. मी अतिशय प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने ‘पद्मावती’ बनवला आहे. राणी पद्मावतीची कथा मला नेहमीच प्रेरित करत आली आहे. तिचे शौर्य, आत्मबलिदानापुढे मी नतमस्तक होत आलोय. पण काही अफवांमुळे ‘पद्मावती’ला विरोध होत आहे. राणी पद्मावती व अलाऊद्दीन खिल्जी यांच्यावर चित्रपटात कुठलाही प्रेमप्रसंग चित्रीत करण्यात आलेला नाही. मी याआधीही असे कुठले दृश्य चित्रपटात असल्याचा इन्कार केला आहे. मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की, कुणाच्याही भावना दुखावतील, असे काहीही चित्रपटात नाही. चित्रपट साकारताना आम्ही राजपुत घराणेशाहीची मानमर्यादा राखली आहे, असे त्यांनी म्हटले होते.

Web Title: Padmavati Controversy: Supreme Court relief! Now the promise of 'Padmavati' in the Censor Board!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.