​‘पद्मावती’ रिलीज होणारच! दीपिका पादुकोणने विरोधकांना सुनावले !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2017 11:52 AM2017-11-14T11:52:50+5:302017-11-14T17:26:39+5:30

‘पद्मावती’ रिलीजला देशभर विरोध होत असला तरी कदाचित ‘पद्मावती’ टीम या विरोधाला पुरून उरणार असे दिसतेय. काही राजपूत संघटनांनी ...

Padmavati will be released! Deepika Padukone told the opponents! | ​‘पद्मावती’ रिलीज होणारच! दीपिका पादुकोणने विरोधकांना सुनावले !

​‘पद्मावती’ रिलीज होणारच! दीपिका पादुकोणने विरोधकांना सुनावले !

googlenewsNext
द्मावती’ रिलीजला देशभर विरोध होत असला तरी कदाचित ‘पद्मावती’ टीम या विरोधाला पुरून उरणार असे दिसतेय. काही राजपूत संघटनांनी ‘पद्मावती’ रिलीज न होऊ न देण्याची धमकी दिली आहे. त्यातच आता राजकीय नेत्यांनीही ‘पद्मावती’ला विरोध चालवला आहे. अलीकडे ‘पद्मावती’चे दिग्दर्शक संजय लीला भन्साळींनी विरोध शांत करण्याचा प्रयत्न केला. चित्रपटात इतिहासाचा अवमान होईल, असे काहीही नाही, असे त्यांनी सांगितले. पण याऊपरही चित्रपटाला होत असलेला विरोध थांबला नाही, उलट तो वाढतोच आहे. हा विरोध बघून, या चित्रपटात राणी पद्मावतीची भूमिका साकारणारी दीपिका पादुकोण मैदानात उतरली आहे. ‘पद्मावती’ रिलीज होणे अतिशय गरजेचे आहे आणि हा चित्रपट रिलीज होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, असे तिने विरोधकांना सुनावले आहे.



ALSO READ: महाराष्ट्रातही ‘पद्मावती’ला विरोध ; भाजपा आमदाराने लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र!

‘आम्ही केवळ आणि केवळ सेन्सॉर बोर्डाला उत्तर देण्यास बांधिल आहोत. एक महिला या नात्याने या ऐतिहासिक चित्रपटाचा भाग होण्याची संधी मला मिळाली, याचा मला अभिमान वाटतो आहे. ही एक अशी कथा आहे, जी लोकांपुढे यायलाच हवी. चित्रपटाला विरोध होत असेल तर हे दुर्दैवी आहे. एक राष्ट्र म्हणून आपण कुठे आहोत? हा विरोध अतिशय भयावह आहे. आपण सगळे पुढे जाण्याऐवजी मागे जातोय. आम्ही केवळ सेन्सॉर बोर्डाला उत्तर देण्यास बांधिल आहोत. चित्रपट प्रमाणित करण्यात कुठलीही अडचण येणार नाही, याचा मला पूर्ण विश्वास आहे. हा चित्रपट रिलीज होण्यापासून आता कुणीच रोखू शकत नाही. हा लढा केवळ ‘पद्मावती’चा नाही तर एक खूप मोठी लढाई आम्ही लढतो आहोत,े’ असे दीपिका म्हणाली.
‘पद्मावती’च्या विरोधात आता राजकीय नेतेही पुढे सरसावले आहेत. अर्थात बॉलिवूडमधून ‘पद्मावती’ला जोरदार पाठींबा मिळतो आहे. काल सोमवारी बॉलिवूडच्या पाच संघटनांनी बैठक घेत, ‘पद्मावती’ला पाठींबा जाहिर केला. या पाचही संघटना येत्या १६ नोव्हेंबरला १५ मिनिट शूटींग थांबवून आपला विरोध नोंदवणार आहेत.

Web Title: Padmavati will be released! Deepika Padukone told the opponents!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.